आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खंडणी:बदनामीकारक बातमी छापून आणण्याची धमकी देत डॉक्टरकडे मागितली पाच लाखांची खंडणी, तिघांवर गुन्हा दाखल

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव जिल्ह्यातील बोदवडमधील एका डॉक्टरला बदनामीकारक बातमी छापुन बदनामी करण्याची धमकी देत पाच लाखांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. प्रकरणी सोमवारी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खंडणी का मागितली?

शहरातील डॉ. यशपाल समाधान बडगुजर (वय 42) यांचे समछाया नावाचे हॉस्पिटल आहे. शहरातील सलीमशहा बशीरशहा यांनी डॉ. बडगुजर यांच्याकडे मुळव्याधवर उपचार घेतले होते. परंतू, चुकीच्या पद्धतीने उपचार केल्यामुळे कॅन्सर झाला, असा आरोप करत सलीमशहा याने डॉ. बडगुजर यांच्याकडे 5 लाखांची खंडणी मागितली. तसेच खंडणी न दिल्यास पेपरमध्ये बदनामीकारक बातमी छापून बदनामी करण्याची धमकी दिली.

बातमी छापून आणेन म्हणत..

तसेच नंदु उर्फ नंदलाल श्याम पटे, अशोक भवरलाल झाबक (सर्व.रा. बोदवड) यांनी त्यांच्या ‘थर्ड आय’ या वृत्तपत्रामध्ये जाहिरात देण्यासाठी तसेच सलीमशहासाठी पैशांची मागणी करुन खंडणी मागीतली. खंडणी न दिल्यास डॉ. बडगुजर यांना पेपरमध्ये बदनामीकारक बातमी छापून बदनामी करण्याची धमकी दिली.

त्यावर डॉ. बडगुजर यांनी खंडणी देण्यास नकार दिला. त्यामुळे पटे आणि झाबक यांनी त्यांच्या ‘थर्ड आय’ या वृत्तपत्रामध्ये डॉक्टरांची बदनामीकारक वृत्त छापून, या पेपरचे कात्रण बोदवड शहरातील वर्दळीच्या ठिकाणी चिकटवून बदनामी केली, अशा आशयाची तक्रार डॉ. यशपाल बडगुजर यांनी पोलिसात केली आहे.

खंडणीचा गुन्हा दाखल

त्यानुसार तीन संशयित आरोपींविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास सहाय्यक फाैजदार सुधाकर शेजोळे हे करत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे बोदवड शहरात खळबळ उडाली आहे. वृत्तपत्रातून बदनामीकारक वृत्त छापल्याने लोकांच्या संतप्त प्रतिक्रीया समोर येत आहेत.