आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालगृह-निरीक्षणगृहातील मुलांच्या पर्यावरणपूरक गणपतींना मागणी:प्रत्येक गणपतीसोबत एक रोप देण्याचा उपक्रम भावतोय नागरिकांना

जळगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिविक्षा आणि अनुरक्षण संघटना संचालित मुला-मुलींचे बालगृह/निरीक्षणगृहातील मुलांच्या पर्यावरणपूरक गणपतींना मोठी मागणी आहे. येथील मुलांनी 17 गणपती तयार केले होते. यातील केवळ तीनच गणपती शिल्लक आहेत. इतर सर्व गणपती बुक झाले आहेत. बालगृह-निरीक्षण गृहातील या मुलांनी शाडूमातीपासून पर्यावरणपूरक तयार केलेल्या गणतती मूर्तींसोबत एक रोप देण्याचा उपक्रम नागरिकांना भावत असल्याचे अधीक्षिका जयश्री पाटील यांनी सांगितले.

निरीक्षण/बालगृहात अनाथ, निराधार, निराश्रीत, वाट चुकलेली मुले येतात. या मुलांना व्यावसायिक व शैक्षणिक पुनर्वसन करून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम संस्था करते. त्या अंतर्गत येथील 30 मुलांना गेल्या 15 दिवसांपासून गणपती बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात येत होते. या प्रशिक्षणातून मुलांनी अतिषय सुंदर अशा 17 मूर्ती घडवल्या. या शाडूमातीच्या व नैसर्गिक रंगातून रंगवलेल्या प्रत्येक मूर्तीबरोबर एक रोप देऊन खरेदी करणाऱ्याला संगोपन करण्याची विनंती करण्यात येत होती.

गरजा भागवता येणार

मूर्ती विकून आलेल्या पैशातून या मुलांच्या आवश्यक गरजा भागवण्यात येणार आहेत. येथील प्रत्येक 451 रुपयांना विकली गेली. या मूर्ती निरीक्षण गृहाबाहेर स्टॉल लावल्याबरोबर या सर्व मूर्ती हातोहात विकल्या गेल्या. या मूर्ती अधिकाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांनी देखील खरेदी केल्या. या स्टॉलचे उद्घाटन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले.

रोटरी इलाईटतर्फे प्रशिक्षण

बालगृह-निरीक्षण गृहातील या मुलांना रोटरी क्लब ऑफ इलाईटतर्फे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणात 30 मुलांनी भाग घेतला. या सर्व मुलांनी हे 17 गणपती बनवण्यास हातभार लावला. या मूर्ती बनवण्यासाठी क्लबने नैसर्गिक रंग, शाडूमाती व प्रशिक्षणार्थी यांची उपलब्धता केली होती. या सर्व मुलांना योगिता ढाके यांनी प्रशिक्षण देत त्यांच्याकडून गणेशाचे साकार रूप घडवून आणण्यासाठी मोठा हातभार लावला.

या रोपांचे झाले वाटप

बालगृह-निरीक्षण गृहातील या मुला तयार केलेल्या प्रत्येक गणपती सोबत मोठे सावली देणारे रोप देण्यात येत होते. हे रोप देताना त्याचे संगोपन करण्याबाबत घेणाऱ्यांना सांगण्यात येत होते. यात कडूनिंब, बदाम, वड, पिंपळ, बदाम, औंदुबर अशी सावली देणारी देशी रोपे खरेदीदारांना वाटप करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...