आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजेईई मेन परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अनिवार्य असलेली नॅशनल एलिजिबिलिटी एन्ट्रन्स टेस्ट (नीट) ही प्रवेश परीक्षा रविवारी घेतली जाणार आहे.
जळगाव जिल्ह्यातील १३ परीक्षा केंद्रांवर ६ हजार ४ विद्यार्थी प्रविष्ठ होणार आहेत. नीट परीक्षा मराठी, हिंदी व इंग्रजीसह १३ भाषांत होईल. नीट परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होणार असून देशभरातील विविध शहरांतील केंद्रांवर एकाचवेळी ही परीक्षा होणार आहे.
या परीक्षेसाठी लाखो विद्यार्थी प्रविष्ठ होणार असल्याने परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विशेष खबरदारी घेतली जाणार आहेत. परीक्षा केंद्रात जाण्यापूर्वी मेटल डिटेक्टरद्वारे विद्यार्थ्यांची तपासणी झाल्यानंतर प्रवेश दिला जाईल. तसेच विद्यार्थ्यांना कोणतेही इलेक्ट्राॅनिक साहित्य घेऊन जाण्यास बंदी असेल. सकाळी ११.३० वाजेपर्यंत विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.
वैद्यकीय अभ्यासक्रमातील एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएसएमएस, बीयूएमएस आणि बीएचएमएस या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी संयुक्तरित्या नीट परीक्षा घेतली जाते. नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे अखिल भारतीय स्तरावरील महत्वांच्या परीक्षांचे अायोजन केले जाते. इंजिनिअरिंग प्रवेशासाठी जेईई मेन परीक्षेचा पहिला व दुसरा टप्पा घेण्यात आल्यानंतर या परीक्षेचा निकालही नुकताच जाहीर झाला. जेईई मेन झाल्यानंतर लाखो विद्यार्थ्यांचे लक्ष नीट परीक्षेकडे लागले आहे.
नीट परीक्षेचे वेळापत्रकासह अभ्यासक्रम, पात्रता, परीक्षा केंद्र या विषयीची सर्व माहिती https://neet.nta.nic .in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात अाली अाहे. परीक्षेसाठी हाॅलतिकीट एनटीएच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. परीक्षेची तयारी पूर्ण झालेली अाहे.
१८० प्रश्नांसाठी ७२० गुण, ३ तास २० मिनिटांचा अाहे वेळ वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांतील प्रथम वर्ष प्रवेशासाठी नीट परीक्षा अनिवार्य आहे. नीट परीक्षा लेखी स्वरूपात घेतली जाते. दुपारी २ ते ५.२० या वेळेत नीट परीक्षा होईल. या परीक्षेत बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री या तीन विषयांवर एकूण १८० प्रश्न विचारले जातील. एकूण ७२० गुणांसाठी परीक्षा होईल. एमसीक्यू पद्धतीने विभाग ‘ए’ अाणि ‘बी’ अशा दोन सत्रात प्रश्नांची विभागणी असेल.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.