आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांना दिलासा:पीक कर्जावर 200 रुपये प्रक्रिया‎ शुल्क आकारण्याचा निर्णय रद्द‎, जिल्हा बँकेच्या बैठकीत निर्णय

जळगाव‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव‎ जिल्हा बँकेतर्फे शेतकऱ्यांना देण्यात‎ येत असलेल्या पीक कर्जातून २००‎ रुपये प्रक्रिया शुल्क आकारण्याचा‎ निर्णय शनिवारी झालेल्या संचालक‎ मंडळाच्या बैठकीत रद्द करण्यात‎ आला. बँकेच्या सुमारे २०० नवीन‎ कर्मचाऱ्यांची नियमानुसार पगारवाढ‎ करण्याचा निर्णय झाल्याची माहिती‎ चेअरमन संजय पवार यांनी दिली.‎ पीक कर्जावर आकारण्यात येत‎ असलेल्या २०० रुपये प्रक्रिया‎ शुल्काला शेतकऱ्यांसह विविध‎ कार्यकारी सोसायटीचे चेअरमन व‎ संचालकांनीही विरोध केला होता. हे‎ शुल्क रद्द करण्याची मागणी केली‎ होती. ‘दिव्य मराठी’ने २६ एप्रिल रोजी‎ प्रक्रिया शुल्काबाबत वृत्त प्रसिद्ध केले‎ होते.

पीक कर्जाची रक्कम खात्यात

ज्या शेतकऱ्यांच्या एटीएमची‎ मुदत संपलेली आहे. त्यांना पीक‎ कर्जाची रक्कम बँक खात्यात देण्यात‎ येणार आहे. जिल्ह्यातील रहिवासी‎ असलेल्या शेतकऱ्यांची इतर जिल्ह्यात‎ शेती असल्यास त्यांनाही पीक कर्ज‎ देण्याबाबत मागच्या बैठकीत निर्णय‎ घेण्यात आला होता.

अशा‎ शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यासाठी त्या‎ जिल्ह्यातील तालुका निबंधकांची‎ ना-हरकत आवश्यक आहे. संत‎ मुक्ताई संस्थानने बँकेकडून चार ते‎ पाच काेटींचे कर्ज घेतलेले आहे.‎ थकीत कर्ज वसुलीसाठी वन टाइम‎ सेटलमेंट योजना लागू करण्याचा‎ निर्णय आगामी बैठकीत हाेणार अाहे.‎