आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर संजय पवार विजयी झालेत, तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे अमोल पाटील बिनविरोध निवडून आले.
राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार रवींद्र पाटील यांना पवार यांनी अस्मान दाखवले. त्यामुळे हा राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का आहे. संजय पवार हे अजित पवारांचे निकटवर्तीय समजले जातात.
राजीनाम्यानंतर निवडणूक
जळगाव बँकेच्या अध्यक्षपद निवडीसाठी आज महाविकास आघाडीचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली. जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार गुलाबराव देवकर, उपाध्यक्ष श्यामकांत सोनवणे यांनी राजीनामा दिल्याने ही निवडणूक झाली.
देवकर यांनी बँकेच्या कार्यकारी संचालकांकडे दिलेला पदाचा राजीनामा सहकार विभागातर्फे मंजूर करण्यात आला होता. संचालक मंडळाच्या बैठकीत देवकर यांचा राजीनामापत्र देण्याची सूचना सहकार विभागाकडून करण्यात आली होती.
जिल्हा बँकेतील पक्षीय बलाबल
जिल्हा बँकेत महाविकास आघाडीतील घटकपक्ष म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे गट हे सत्तेत आहेत. सध्या जिल्हा बँकेत राष्ट्रवादीचे 10, ठाकरे गटाचे दोन, काँग्रेसचे तीन, शिंदे गटाचे पाच, भाजपचा एक, असे पक्षीय बलाबल आहे.
21 नोव्हेंबर 2021 रोजी महाविकास आघाडीच्या माध्यमातून बँकेची निवडणूक लढविण्यात आली होती. गतवर्षी शिवसेनेत फूट पडली. बँकेचे उपाध्यक्षपद ठाकरे गटाकडे आहे. उपाध्यक्षपदी आता शिंदेंच्या शिवसेनेतील अमोल पाटील निवडून आले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.