आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव जिल्हा STकर्मचारी सहकारी पतपेढी निवडणूक:चुरस वाढणार, पतपेढीची 6 हजार सभासद संख्या निम्म्यावर

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा एसटी कर्मचारी सहकारी पतपेढीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. या पतसंस्थेची मुदत एक वर्षापूर्वीच संपलेली होती. मात्र, कोरोनामुळे सर्वच सहकारी संस्थांचा निवडणुका पुढे ढकलल्या होत्या. मात्र, आता या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. दरम्यान जळगाव, धुळे व नाशिक जिल्ह्यात गेल्या निवडणुकीत सहा हजार सभासद संख्या असलेल्या एसटी कर्मचारी सहकारी पतपेढीचे या निवडणुकीत केवळ २९०० सभासद उरले आहे. त्यामुळे यंदा ही निवडणूक चुरशीची होणार असून सर्वच संघटना पॅनल उभे करणार आहेत.

जळगाव जिल्हा एसटी कर्मचारी सहकारी पतपेढीत गेल्या निवडणुकीत ६ हजार सभासद संख्या होती. मात्र, आता केवळ २९०० सभासद उरले आहेत. यात २७४ सभासद नाशिक, १२०५ धुळे तर १४२१ सभासद संख्या ही जळगाव जिल्ह्याची आहे. यात १२ सर्वसाधारण, २ महिला व इतर ३ असे एकूण १७ संचालक निवडून येतात. सध्या पतसंस्थेत कामगार संघटनेचे वर्चस्व असून यंदा या कामगार संघटनेसह महाराष्ट्र एसपी वर्कस (इंटक), कामगार सेना, कास्ट्राईब संघटना व नवीनच स्थापित झालेली एसटी कष्टकरी जनसंघाचे या निवडणुकीत उतरत असल्याने यंदा निवडणूक चुरशीची होणार आहे.

असा आहे निवडणूक कार्यक्रम

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने जळगाव जिल्हा एसटी कर्मचारी सहकारी पतपेढीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. यात ३ ते ९ फेब्रुवारीदरम्यान नामनिर्देशपत्र दाखल करण्यात येईल. १० फेब्रुवारीला नामनिर्देशपत्र छाननी, तर १३ फेब्रुवारीला माघारीची तारीख आहे. २८ फेब्रुवारीला निशाणी वाटप करण्यात येऊन १२ मार्चला मतदान घेण्यात येणार आहे. तर १३ मार्चला मतमोजणी होणार आहे.

इंटकचे पूर्ण पॅनल

सभासदांच्या हितासाठी या निवडणुकीत इंटक संघटना नेहमीप्रमाणे पूर्ण पॅनल उभे करणार आहे. दरम्यान, राज्य सरचिटणीस मुकेश तिगोटे १० दिवस या निमित्ताने येत आहे. - नरेंद्रसिंह राजपूत, विभागीय सचिव इंटक संघटना.

बातम्या आणखी आहेत...