आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्राहकांची पसंती:ऑनलाइन वीज बिल भरण्यात जळगाव विभाग ‘टॉप टेन’मध्ये ; कॅशलेस : परिमंडळात 1475.33 कोटींचा भरणा, ग्राहकांची पसंती

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महावितरणला राज्यभरातील ग्राहकांनी कॅशलेस वीज बिल भरण्यात मोठा प्रतिसाद दिला आहे. यात जळगाव परिमंडळ टॉप टेनमध्ये आहे. राज्यातील एकूण वीज बिलांच्या रकमेपैकी तब्बल ७२ टक्के रकमेचा भरणा करण्यासाठी ग्राहकांनी ऑनलाइनचा पर्याय निवडला आहे. यात जळगावने एकूण वीज बिलांच्या रकमेपैकी १४७५.३३ कोटी अर्थात ६१.३८ टक्के रकमेचा भरणा ऑनलाइन झाला आहे. कोरोनापासून संख्या वाढली : कोरोनापासून जळगाव परिमंडळात ऑनलाइन वीज बिल पेमेंट करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. सात-आठ वर्षांपूर्वी ऑनलाइनद्वारे वीज बिल भरण्याचे प्रमाण नगण्य होते. ऑनलाइन वीज बिल भरण्यास ग्राहकांनी पसंती दिल्याने हे प्रमाण वाढले. विशेषत: कोरोना काळात ऑनलाइनद्वारे वीज बिलांचा भरण्याकडे ग्राहकांचा कल अधिक वाढला आहे. ऑनलाइन वीज बिल भरीत असल्यास त्या ग्राहकाला वीज बिलाच्या ०.२५ टक्के किंवा जास्तीत जास्त ५०० रुपयांपर्यंत सूटही मिळते. महावितरणने सर्व वर्गवारीतील ग्राहकांना सर्व सेवा डिजिटल माध्यमांद्वारे उपलब्ध करून दिल्या आहेत. यामध्ये सर्व वीज ग्राहकांसाठी www.mahadiscom.in ही वेबसाइट व महावितरण मोबाइल ॲप तसेच उच्च दाब ग्राहकांसाठी स्वतंत्र आरटीजीएस सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे प्रामुख्याने दरमहा वीज बिलांचा भरणा ऑनलाइन करण्यासोबतच महावितरणच्या सर्व ग्राहकसेवा देखील लघुदाब व उच्च दाब वर्गवारीतील ग्राहकांसाठी एका क्लिकवर उपलब्ध आहेत. लघुदाब औद्योगिक, वाणिज्यिक व घरगुती ग्राहकांचे वीज बिल १० हजार रुपयांपेक्षा अधिक असल्यास त्यांना आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे थेट वीज बिल भरण्याची सोय उपलब्ध आहे. त्यासाठी १० हजारांपेक्षा अधिक रकमेच्या वीज बिलावर महावितरणच्या बँक खात्याचा तपशील देण्यात येत आहे. तर यापेक्षा कमी रकमेच्या बिलांचा भरणा करण्यासाठी महावितरणची अधिकृत वेबसाइट तसेच मोबाइल ॲपची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...