आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा उपक्रम:जळगाव शहरात 2 हजार स्वच्छतादूतांनी केला 103 टन कचरा जमा

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत स्वच्छ व सुंदर शहरासाठी जनजागृती निर्माण व्हावी याकरिता डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडाच्या 1987 श्री सदस्य स्वच्छतादूतांनी बुधवारी शहरातील विविध भागात महास्वच्छता अभियान राबवित पाच तासात 211 टन कचरा संकलित केला. संकलित केलेला कचरा नेरीनाक्या परिसरात जमा करण्यात आला आहे, त्याची आव्हाने येथील डंपींग ग्राऊंड येथे विल्हेवाट लावली जाणार आहे. यात युवकांचा लक्षणीय सहभाग दिसून आला.

प्रतिष्ठान तर्फ नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी निमित्त शहरासह धरणगाव, जामनेर, एरंडोल, येथे हे अभियान राबविण्यात आले. सकाळी 7 वाजेपासूनच श्री सेवक आपल्या नियुक्तीच्या ठिकाणी जमा झाले होते. कचरा उचलण्यासह ट्रॅक्टर व अन्य वाहनात टाकण्यासाठी घमेली, पावडे, ग्लोज ही प्रतिष्ठानकडूनच पुरविण्यात आली होती. शिस्तबद्द पद्धतीने कुठलाही आवाज, गोंधळ न करता श्री सेवकांच कार्य सुरू होते.

शहरातील शाळा, महाविद्यालयातील परिसरासह शासकीय इमारती, सिंधी कॉलनी, शेरा चौक ते लढ्ढा फॉर्म समोरील रस्ता पूर्ण परिसर ,कालिका माता मंदिर ते नेरीनाका,महात्मा फुले मार्केट,गोलाणी मार्कट आकाशवाणी चौक, इच्छादेवी चौक व मुख्य बाजारपेठ, जिल्हापेठेतील काही भागात स्वच्छता करण्यात आली. ओला कचरा व सुका कचरा वेगळा करण्यात आला. महापालिका प्रशासनाकडून कचरावाहून नेण्यासाठी 25 ट्रॅक्टर उपलब्ध होते. यासह प्रतिष्ठानातील सदस्यांनीचीही 15 छोटी वाहन कार्यरत होती.

जिल्हाधिकारी कार्यालयापासून सुरूवात

जिल्हाधिकारी कार्यालया जवळून या अभियानाची सुरुवात झाली. मनपा आयुक्त विद्या गायकवाड, महापौर जयश्री सुनील महाजन, आरोग्य उपायुक्त उदय पाटील, भरत सपकाळे, भगत बालाणी, मनोज चौधरी यांनी श्रीफळ फोडून सुरवात केली. नगरसेवक प्रवीण कोल्हे, इब्राहिम मुसा पटेल, नवनाथ दारकुंडे यांच्यासह अन्य सामाजिक कार्यकर्त्यांनीही सहभाग घेतला.

कचरा जाणार डंपींग ग्राऊंडवर

रस्त्यावरील प्लास्टीक पिशव्या, बाटल्यांसह काड्याकचरा श्रीसेवकांनी पिशव्यांमध्ये जमा केला. जमा झालेला कचरा घमेल्यांनी भरून वाहनात टाकण्यात आला. मध्यवर्ती भागातून जमा केलेला कचरा सुरवातीस ट्रॉफीकगार्डन, व नेरीनाका स्मशानभूमी मागे जमा करण्यात आला. यानंतर महापालिकच्या ट्रॅकरने तो आव्हाने येथील डंपींग ग्राऊंडवर नेण्यात आल्याची माहिती प्रतिष्ठानच्या पथक प्रमुखांनी दिली.

60 श्रीसेवकांची 18 पथके

या मोहिमेसाठी दोन हजार कार्यकर्त्यातून 18 पथके तयार करण्यात आली होती. प्रत्येक पथकात सुमारे 50 स्वंसेवक सहभागी होते. यामुेळ शहरातील बहुतांश भागात शिस्तीत आणि शांततेत स्वच्छतेचे कार्य करणारे कार्यकर्ते दिसत होते. कार्यकर्ते मनोभावे सेवा करीत असल्याच चित्र दुपारपर्यंत होते.

-----------

बातम्या आणखी आहेत...