आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:तालुक्यात चार ठिकाणी‎ आग; कृषी माल खाक‎, वीजेची तार तुटल्याने स्पार्किंग

जळगाव‎18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव‎ तालुक्यात शुक्रवारी तीन व‎ शनिवारी एका ठिकाणी अाग लागून ‎कृषी माल जळून खाक झाला. नांद्रा ‎बुद्रुक येथे दाेन, सावखेडा येथे एक‎ तर वावडदा येथे एक अशा चार घटनांमध्ये एमएससीबीच्या‎ इलेक्ट्रिक तार तुटणे व चिकटून स्पार्किंग झाल्यामुळे आग‎ लागल्याची बाब समाेर आली आहे.‎ या प्रकरणी तालुका पाेलिस ठाण्यात ‎अागींची नाेंद करण्यात आली आहे.‎

नामदेव यादव पाटील यांच्या ‎सावखेडा खुर्द शिवारातील शेतात एमएससीबीची इलेक्ट्रिक तार तुटून ‎शुक्रवारी दुपारी २ वाजता अाग‎ लागली. या अागीत २२५००० ची‎ केळी पीक व ठिबक नळ्या‎ जळाल्या.

नक्की घडले काय?

किरण शालिग्राम पाटील‎ (वय ४३, रा. नांद्रा, ता. जळगाव)‎ यांच्या शेतात शुक्रवारी ३ वाजेच्या‎ सुमारास एमएससीबीची इलेक्ट्रिक‎ तार एकमेकाला चिकटून स्पार्किंग‎ हाेऊन खाली शेतात असलेल्या‎ मका पिकाचे व ठिबक नळ्या,‎ पीव्हीसी पाइप जळालेत. अागीत‎ सुमारे २ लाखांचे नुकसान झाले.‎ याच शेता शेजारी असलेल्या‎ भय्यासाहेब पंजाबराव पाटील (वय‎ ५१) यांच्या शेतातही ही अाग‎ पसरून त्यांच्या केळी पिकाचे १‎ लाख रुपयांचे नुकसान झाले.‎

वावडदा येथे दाेन‎ एकर ऊस जळाला‎

वावडदा येथे गट नं.‎ १२७ मधील शेतात शॉर्टसर्किट होऊ‎ झालेल्या आगीत २ एकरावरील‎ सुमारे ४ लाख रुपयांचा ऊस जळून‎ खाक झाला. जानकीराम पाटील‎ यांच्या शेतात शनिवारी सकाळी ही‎ घटना घडली. पाटील हे एक एकर‎ शेतात स्वत: ऊस पिकवून रसवंती‎ चालवत होते. कापणीवर आलेला‎ ऊस शॉर्टसर्किटमुळे खाक झाल्याने‎ पाटील यांचे मोठे नुकसान झाले.‎ भरपाई मिळावी, अशी मागणी‎ पाटील यांनी केली आहे.‎