आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2 लाखांत तरुणीची विक्री, 10 महिने अत्याचार:नाश्त्यातून गुंगीचे औषध देऊन 2 महिलांनी केले अपहरण, मध्य प्रदेशात बळजबरी लावले लग्न

जळगाव16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोन अनोळखी महिलांनी नाश्त्यात गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध केलेल्या तरुणीची दोन लाख रुपयांत विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार जळगावमध्ये समोर आला आहे. विक्री केल्यानंतर जीवे मारण्याची धमकी देत तरुणीचे मध्य प्रदेशातील युवकाशी लग्न लावण्यात आले. नंतर ​युवकाने व त्याच्या कुटुंबीयाने पीडितेवर तब्बल 10 महिने अत्याचार केले. या प्रकरणी रावेर पोलिस ठाण्यात बुधवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.

बसस्थानकावर तरुणीला गाठले

पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, 13 जुलै 2021 रोजी ती रावेर बसस्थानकावर असताना दोन अनोळखी महिलांनी तिला नाश्त्यातून गुंगीचे औषध दिले. बेशुध्द झाल्यानंतर लग्न लावून देण्याच्या उद्देशाने तिची २ लाख रुपयांमध्ये मध्य प्रदेशात विक्री करण्यात आली. जीवे मारण्याची धमकी देत तिचे उज्जैन येथे राहणाऱ्या राकेश शर्मा याच्याशी जबरदस्तीने लग्न लावून देण्यात आले. लग्नानंतर त्याने पीडितेवर वारंवार बलात्कार केले. पीडितेची सासू, सासरे, दीर, ननंद यांनी संगनमताने तिला डांबून ठेवले. यादरम्यान पीडितेला मारहाणही करण्यात आली.

पीडितेला डांबून ठेवले

पीडिता पळून जाऊ नये म्हणून राकेश शर्माच्या कुटुंबीयांनी तिला डांबून ठेवले होते. पीडिता तब्बल 10 महिने मध्य प्रदेशातील एका घरात कोंडलेल्या स्थितीत होती. 10 महिन्यानंतर ती त्यांच्या तावडीतून सुटून कशीबशी रावेर येथे परतली. 15 जून रोजी बुधवारी रात्री उशीरा तिने रावेर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणी आरोपी राकेश शर्मा, दोन अनोळखी महिला, सासू, सासरे, दीर, नणंदेसह एकूण आठ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अटक करण्यासाठी रावेर पोलिस मध्य प्रदेश येथे रवाना झाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...