आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लज्जास्पद:पतीने पैशासाठी बिझनेस पार्टनरसोबत पत्नीला शारिरीक संबंध ठेवण्यास भाग पाडले, आरोपींविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल

जळगाव8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पैसे आणि व्यवसायासाठी पतीने तिच्याशी गैरवर्तने केल्याचा महिलेचा आरोप, बलात्काराचा व्हिडिओ बनवला

जळगावमधून एक लज्जास्पद घटना समोर आली आहे. येथे पतीने स्वतःच्या फायद्यासाठी पत्नीला मित्रासोबत शारिरीक संबंध बनवण्यास भाग पाडले. पत्नीच्या तक्रारीवरून जळगावच्या रामानंद नगर पोलिस ठाण्यात पती आणि मित्राविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पतीन व्यवसाय आणि पैशांसाठी असे कृत्य केल्याचा पत्नीने आरोप केला आहे.

धुळ्याच्या मैहर येथे राहणारी पीडितेने सांगितले की, पती व्यावसायिक आहे. लॉकडाउनमध्ये काम बंद झाल्यामुळे त्याने एका मित्रासोबत भाजीविक्रीचे काम सुरू केले. पतीला त्याच्या भागात भाजी विकायला लाज वाटत होती. यामुळे तो कुटुंबासोबत त्याच्या मित्राच्या घरी राहायला गेला.

मित्रासमोर कपडे काढण्यास भाग पाडले

महिलेचा आरोप आहे की, 5 जूनच्या रात्री पतीने मित्रासोबत तिला कपडे बदलायला भाग पाडले. महिलेने नकार दिल्यानंतर पतीने तिला मारहाण केली आणि मुलांना जीवे मारण्याची धमकी दिली. धमकीमुळे तिला पतीचे म्हणणे ऐकावे लागले. मात्र 8 जून रोजी पतीन हद्दच केली. पत्नीला मित्रासोबत शारिरीक संबंध बनवण्यास सांगितले. पीडितेने नकार दिल्यानंतर पतीने मुलांना जीवे मारण्याची धमकी दिली.

आरोपींनी बनवला बलात्काराचा व्हिडिओ

पीडितेने पोलिसांनी सांगितले की, आरोपींनी तिला कोल्ड्रिंगमध्ये औषध दिले. यानंतर पती आणि मित्र तिला बाथरूममध्ये घेऊन गेले. पतीने तिला पकडले आणि मित्राने तिच्यावर अत्याचार केले. दोघांनी बलात्काराचा व्हिडिओ देखील बनवला आणि कोणाला सांगितल्यास मुलांना जीवे मारण्याची आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. यादरम्यान महिलेचे प्रकृती बिघडल्यानंतर पतीने तिला 17 जुलै रोजी माहेरी सोडले.

बातम्या आणखी आहेत...