आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंगळग्रह मंदिर:अमळनेरनंतर राज्यातील दुसरे तर देशातील तिसरे मंगळग्रह मंदिर जळगावात ; मंगळग्रह मंदिराची उभारणी केली जाते आहे

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात केवळ अमळनेर येथे मंगळग्रह मंदिर उभारण्यात आलेले आहे. त्यानंतर दुसरे मंदिर जळगावात निमखेडी रस्त्यालगतच्या तपोवनात गेल्या दोन महिन्यात उभारण्यात आले आहे. हे मंदिर उज्जैन, अमळनेरनंतर देशातील तिसरे मंदिर ठरले आहे. त्याशिवाय तपोवनात भक्तांनी दिलेल्या देणगीतून बारा ज्योतिर्लिंगांसह पंधरा देवी-देवतांचीही मंदिरे उभारण्यात आली आहेत. वर्षभरात परिसराचा चेहरा-मोहरा बदलणार आहे. अमळनेर येथील मंगळग्रह मंदिराचा सन १९३३मध्ये जिर्णोद्धार झालेला आहे. मंगळदोष निवारणासाठी भाविक येथे माेठ्या संख्येने येतात. देशात मंगळग्रहाची मोजकीच मंदिरे आहेत. उज्जैन येथे मंगलनाथ मंदिर आहे. महाराष्ट्रात अमळनेरनंतर जळगाव शहरातील निमखेडी रस्त्यालगतच्या तपोवनात मंगळग्रह मंदिराचे निर्माण झाले आहे. बद्रीनाथ येथील दिगंबर आखाड्याचे महंत सर्जुदास महाराज यांच्या पुढाकाराने मंगळग्रह मंदिराचे निर्माण झाले आहे. गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून ते महाराष्ट्रात आहे. तपोवनात सुमारे तीन एकर जागेवर मंगळग्रह मंदिरासह माता काली, हनुमान, दुर्गा, नवदुर्गा, सोमेश्वर महादेव, बटुक भैरव, गणेश, शनिदेव, दत्त, शीतला माता, मनोकामना सिध्द हनुमान, साईबाबा, मुंजोबा, गजानन महाराज अशा देवी-देवतांच्या छोट्या मंदिरांचेही निर्माण करण्यात आले आहे. मनोकामना पूर्ण झालेल्या भक्तांनी दिलेले त्रिशूल ज्याेतिर्लिंगांजवळ लावण्यात आलेे आहेत.

१५ वर्षांपूर्वी तपोवन परिसरातील जागेवर कत्तलखाना नियोजित होता. कामालाही सुरुवात होणार होती. कत्तलखान्यासंदर्भात नाशिक कुंभमेळ्यात आलेले सर्जुदास महाराज यांना जळगावातील नागरिकांकडून माहिती मिळाली. त्यानंतर ते जळगावात दाखल झाले. निमखेडी रस्त्यालगतच्या जागेवर कत्तलखाना होऊ न देण्यासाठी त्यांनी लढा उभारला. या लढ्यात त्यांच्या दिगंबर आखाड्याचे संतही सहभागी झाले होते. त्या जागेवर हनुमान मंदिर उभारण्यात आले. तसेच वृक्षारोपण करण्यात आले. महंतांनी उभारलेल्या लढ्यासमोर प्रशासनाला माघार घ्यावी लागली. सर्जुदासांनी त्या ठिकाणी साधना केली. त्यानंतर तपोवन नावाची ती भूमी ओळखली जात आहे. गेल्या दोन महिन्यात तपोवनात मंगळग्रह मंदिर उभे राहिले आहे. देवांमध्येही भेदाभेद करण्यात येतो. त्यामुळे तपोवनात वेगवेगळ्या देवतांची मंदिरे उभारण्यात आलेली आहेत.

बातम्या आणखी आहेत...