आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहावीच्या परीक्षेचा निकाल:जळगाव जिल्हा 95.72  टक्यांसह नाशिक विभागात दुसऱ्या स्थानी

जळगाव11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च-एप्रिल महिन्यात घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी दुपारी 1 वाजता मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन जाहीर करण्यात आला. यात नाशिक विभागाचा 95.90 टक्के निकाल जाहीर झाला असून, विभागात सर्वाधिक निकाल नाशिक जिल्ह्याचा 96.37 टक्के निकाल लागला आहे. त्यापाठोपाठ जळगाव जिल्ह्याचा निकाल 95.72 टक्के लागला आहे.

नाशिक विभागाचा एकूण निकाल 95.90 टक्के इतका लागला असून, त्यात नाशिक जिल्हा 96.37 टक्क्यांसह पहिल्या क्रमांकावर आहे. तर जळगाव 95.72 टक्क्यांसह दुसऱ्या, धुळे 95.43 टक्क्यांसह तिसऱ्या आणि आदिवासीबहुल असलेला नंदुरबार जिल्हा सर्वात कमी म्हणजे 94.97 टक्क्यांसह चौथ्या क्रमांकावर आहे. जळगाव जिल्ह्यातून यावर्षी 57 हजार 88 विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ठ झाले होते. यातून 54 हजार 646 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपैकी 27 हजार 241 विद्यार्थी हे विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहे. तर 19 हजार 188 विद्यार्थी हे प्रथम श्रेणीत,7 हजार 253 द्वितीय श्रेणीत तर 963 विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे.

असा आहे जिल्ह्याचा निकाल

जिल्हा - नियमित - पुर्नपरीक्षार्थी

नाशिक - 96.37 -82.11

जळगाव - 95.72 - 81.54

धुळे - 95.43- 73.54

नंदुरबार - 94.97 - 59.24

बातम्या आणखी आहेत...