आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत नियमित कर्जफेड करणारे 2315 हजारावर शेतकरी 50 हजार रुपयांपर्यंतचे प्रोत्साहन मिळण्यास पात्र आहेत. त्यांची ई-केवायसीच प्रलंबीत असून अद्याप त्यांना प्रोत्साहनाचा लाभ मिळालेला नाही. जिल्ह्यात आतापर्यंत 48 हजार 382 शेतकऱ्यांना 181.46 कोटी रुपयांचे प्रोत्साहन देण्यात आलेले आहे.
नियमित कर्जफेड करणाऱ्या जिल्ह्यातील 95 हजार 540 खातेदारांची माहिती कर्जमुक्ती योजनेच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आलेली आहे. त्यापैकी 57 हजार 180 शेतकऱ्यांची यादी विशिष्ट क्रमांकासह प्रसिध्द झालेली आहे. त्यापैकी 54 हजार 8665 शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली असून 2315 शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रलंबीत आहे.
668 शेतकऱ्यांच्या प्रोत्साहनाबाबत तक्रारी
प्रोत्साहन योजने अंतर्गत शासनाने पाठवलेल्या यादीनुसार प्रोत्साहन रक्कम 50 हजारांपेक्षा कमी,मृत शेतकरी तसेच आधार क्रमांक चुकीचे असल्याने हा लाभ अडलेला आहे. त्याबाबत 668 शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या आहेत. त्यापैकी 318 तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे.जिल्हास्तरीय समितीकडे 106 तर तहसीलदारांकडे 167 तक्रारी प्रलंबीत आहेत. या त्याबाबत जिल्हा व तालुकास्तवरील समिती सुनावणी घेऊन शासनाच्या पोर्टलवर त्या शेतकऱ्यांची माहिती अपडेट करावयाची आहे.
माहिती अपडेट केल्यानंतर प्रोत्साहन
मृत असलेल्या लाभार्थ्यांच्या वारसांना दाखला सादर करावा लागेल. त्याचप्रमाणे आधार क्रमांक दुरुस्त करावा लागेल. 50 हजार रुपये प्रोत्साहन मिळणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात 32 हजार, 42 हजार अशी रक्कम मंजूर करण्यात आली. योजनेचा लाभ मिळालेला शेतकरी मृत झाला. त्याचप्रमाणे आधार क्रमांक चुकीचा असल्यानेही प्रोत्साहन मिळाले नाही, या स्वरुपाच्या तक्रारी आहेत. तक्रारी शेतकऱ्यांची माहिती अद्ययावत करुन यादी शासनाला पाठवण्यात येईल. तिला मंजुरी मिळाल्यानंतर त्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन रक्कम मिळेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.