आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजळगाव महावितरण कार्यालयात कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचारी तरुणीशी व्यवस्थापक व लिपिकाने गैरवर्तन केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी गुरुवारी दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. उद्धव कडवे असे व्यवस्थापकाचे, तर राजेंद्र आमोदकर असे लिपिकाचे नाव आहे.
चॅटींग करण्याची मागणी
तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार 2017 ते 2021 या काळात उद्धव कडवे हे नेहमीच त्रास देत. सर्व कर्मचारी घरी गेल्यानंतरही उशिरापर्यंत कार्यालयात थांबवून ठेवत. सोबतच त्यांनी व्हाटसअॅपवर चॅटींग करण्याची मागणी केली. तुला घरी सोडून देतो, घरी घेऊन जाण्यासाठी येतो येतो असे सांगून जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचे म्हणणे ऐकुण न घेतल्यामुळे त्यांनी या तरुणीला तीन वेळा कामावरून काढून टाकले. शिवाय पुन्हा घेऊन त्रास देणे सुरूच ठेवले. त्यामुळे कंटाळून 2021 मध्ये पीडित तरुणीने काम सोडले.
5 वर्षांपासून छळ
तरुणीला11 मे रोजी आमोदकर याने फोन करून जावक रजिस्टरमध्ये काही नोंदी करायचे काम शिल्लक असल्याने कडवे साहेबांनी बोलावल्याचा निरोप दिला. त्यानुसार तरुणी 12 मे रोजी कार्यालयात गेली. यावेळी कडवे यांनी मागे झालेल्या प्रकाराची माफी मागितली. टेक्निकल साइटचे लोक माझ्याविरुद्ध कट रचत आहेत, त्यांना तू सपोर्ट करतेस, असे मला कळल्याचे सांगत जाब विचारला. मात्र, तरुणीने त्यावर नकारात्मक उत्तर दिले. तेव्हा तुला पुन्हा कामावर घेण्यासाठी प्रयत्न करतो, असे कडवेंनी सांगितले. काम संपल्यानंतर आमोदकर दुचाकीने घरी सोडून देईल असे सांगितले. परंतु, तरुणीने नकार दिला.
विशाखा समिती नावालाच
आमोदकर याने कार्यालयाच्या परिसरात तरुणीला भेटून कडवे साहेब चांगले आहेत. तुझे काम करून देतील असे सांगितले. असे असतानाच त्याने तरुणीचा विनयभंग केला. या प्रकरणी तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक नीलेश गोसावी या प्रकारणाचा पुढील तपास करत आहे. घडलेल्या प्रकाराची तक्रार तरुणीने महावितरणच्या विशाखा सेलकडे केली. मात्र, समितीने त्यावर काहीच कार्यवाही केलेली नाही. अखेर तरुणीने पोलिस ठाण्याचा दरवाजा ठोठावला.
अधिकाऱ्यांना दिले निवेदन
चार दिवसांपूर्वी पीडित तरुणीने महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन दिले. तसेच विशाखा समितीकडे तक्रार केली. काहीच कारवाई न झाल्यामुळे आज पोलिस ठाण्यात तक्रार केली. त्यानुसार दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे .
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.