आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किरकोळ धक्का लागल्यावरुन तरुणाचा खून!:चोपड्यातील विरवाडे गावातील घटना, एका महिलेसह पाच आरोपी अटकेत

जळगाव20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

किरकोळ धक्का लागल्याच्या कारणावरुन तरुणाच्या घरी जावून दमदाटी करून चाकूने सपासप वार करून खून केला. हा प्रकार चोपडा-तालुक्यातील विरवाडे येथे 2 मार्च रोजी रात्री 9 वाजेदरम्यान घडला. या प्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह पाच संशयितांना अटक केली आहे.

या तरुणाचा खून

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, भोजु वासुदेव कोळी (वय 32) असे मृताचे नाव आहे. त्याच्या मानेजवळ तसेच पाठीवर व इतर ठिकाणी संशयितांनी वार करत गंभीर दुखापत करून त्याचा खुन केला.

दमदाटी, धक्काबुक्की अन् शिवीगाळही

याप्रकरणी चोपडा शहर पोलीस स्टेशनला मृताचे वडील वासुदेव कोळी यांच्या फिर्यादीवरून एकूण पाच जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर संशयितांना तत्काळ अटक देखील करण्यात आली आहे. यात सागर देविदास कोळी (30), दिपक सुभाष कोळी (30), कैलास गुलाब कोळी (35), मनोहर संतोष कोळी (40) व शोभाबाई देविदास कोळी (45) (सर्व रा. विरवाडे ) अशी संशयितांची नावे आहेत. दिपक कोळी व भोजु वासुदेव कोळी यांचा एकमेकांना धक्का लागल्याचे कारणावरुन संशयितांननी भोजु कोळी व राजेंद्र कोळी यांना शिवीगाळ करून दमदाटी तसेच धक्काबुक्की केली.

राग मनात ठेवून शिजवला कट

त्यानंतर सागर कोळी याने राजेंद्र कोळी याचे कपाळावर दगड मारुन डोके फोडुन दुखापत केली. नंतर या भांडणाचा मनात राग ठेवून संशयित आरोपी सागर देविदास कोळी व शोभाबाई देविदास कोळी हे फिर्यादीचे घरासमोर अंगणात येवुन वासुदेव कोळी व त्याचा मुलगा भोजु कोळी यास शिवीगाळ, दमदाटी करत चापटा बुक्यांनी मारहाण केली.

मृताच्या वडीलांनी दिली फिर्याद

त्यावेळी संशयित आरोपी सागर देविदास कोळी याने त्याच्याजवळील चाकुने भोजू कोळी याच्या मानेजवळ, पाठीवर तसेच इतर ठिकाणी मारुन गंभीर दुखापत करुन भोजू कोळी याचा खुन केला. या प्रकरणी चोपडा शहर पोलिस स्टेशनला वासुदेव कोळी यांच्या फिर्यादीवरून भादंवि कलम 302, 337, 323, 504, 506 व 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक कृषीकेश रावले करत आहेत.

रात्रीतून पाच जणांना अटक

याप्रकरणी आरोपी दिपक सुभाष कोळी, कैलास गुलाब कोळी, मनोहर संतोष कोळी,सागर देविदास कोळी,व शोभाबाई देविदास कोळी यांना पोलीसांनी रात्रीच ताब्यात घेवून अटक केली असुन आरोपी सागर कोळी उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे.सागर कोळी हा उपजिल्हा रुग्णालयात पोलीस बंदोबस्तात उपचार घेत असताना त्याला लगेल अटक करा अशी मागणी विरवाडे गावातील काही ग्रामस्थांनी पोलिसांकडे केली होती.

बातम्या आणखी आहेत...