आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभगवे वस्त्र परिधान करुन जटाधारी व शरीरावर चंदनाची राख, भस्म माखलेल्या दोनशेवर नागासाधूंच्या धर्मप्रचार फेरीने सोमवारी शहरात धार्मिक उत्सव साजरा झाला. हातात डमरूंसह 21 अश्वांवर रूढ होऊन, हातात भगवे ध्वज, तलवार, त्रिशूळ, धनुष्य बाण, गदा यांसारखी अवजारं घेऊन जयश्रीराम, पवनपुत्र हनुमान, ‘भम भम भोले’ च्या जयघोष केला. यासह हजारावर साधू शिवखोरा महायज्ञात सहभागी झाले आहेत.
अयोध्येतील श्रीरामनगरीमधील अखिल भारतीय पंचतेरा भाई त्यागी दिगंबर आखाडा खाक चौक नया घाट यांच्या तर्फे पाळधी विद्यापीठ परिसरातील शिवखोरा गोशाळेत सुरु असलेल्या विष्णू महायज्ञ अंतर्गत ही धर्मप्रचार फेरी काढण्यात आली. महायज्ञा निमित्त शहरात दाखल शेकडो नागासाधूंच्या दर्शनाने भाविकांमध्ये धार्मिक उत्साह दिसून आला.
भौतीक सुखाची अपेक्षा नसलेल्या अयोध्या, काशी, मथुरा, वृदांवन, ब्रदीनाथसह द्वारका, केदारनाथ, त्रद्षीकेशहून आलेल्या नागासाधंूनी धर्मरक्षणाचा संदेश दिला. या धर्म प्रचार फेरीने वातावरण भक्तीमय झाले. सजविलेल्या बग्गीमध्ये 1008 महंत सुरदास महाराज, महंत प्रेमदास महाराज मौनी बाबा, महामंडलेश्वल वृक्ष मोहनदास महाराज, संतोषदास महाराज, गंगादास महाराज या व अन्य 84योगविद्या प्रवीण प्रमुख साधूंना बसविण्यात आले. दुपारी एकवाजता शाहूनगरातील तपस्वी हनुुमान मंदीरापासून शोभायात्रेला सुरुवात झाली. मंदीरात बालकदास महाराज यांच्यासह आयोजक लक्ष्मण पाटील, सुनील चौधरी, प्रशांत पाटील, संतोष शेळके, विलास चौधरी यांनी महाआरती करून शोत्रायात्रेची सुरूवात केली. टॉवरचौक, चित्राचौक, स्वातंत्रचौक, बहिणाबाई उद्यान, रिंगरोड मार्गे तपस्वी हनुमान मंदीरात शोभायात्रेचा समारोप झाला.
बिथरलेल्या अश्वाला मिनिटात केले शांत-
शोभायात्रेपूर्वी 21 अश्वांसह गर्दीमुळे बिथरलेल्या एका अश्वाने नागिरकांना चांगलेच हैराण केले. या अश्वास आवरणे कठीण झाले होते. यावेळी संत बालकदास महाराज यांनी अश्वाची दोर हातात घेत, एका मिनिटात त्यावर नियंत्रण आणत शांत केले. या साधूंच्या अनुभूतीने भाविकांचा उत्साह अधिकच वाढला.
कोण आहे नागा साधू
नागा या संस्कृत शब्दाचा मूळ अर्थ पर्वत असा होतो. त्यामुळे पर्वतावर आणि त्याच्या बाजूला राहणाऱ्या लोकांना ‘पहाडी’ किंवा ‘ नागा’ म्हणून ओळखण्यात येतं. निबीड अशा जंगलात, नदीच्या काठी अथवा स्मशानात, किंवा आखाड्यात ते जगत असतात. देशातील परंपरा संस्कृतीचं भगव्या ध्वजाखाली रक्षण करणं हा त्यंाचा उद्देश आहे. परकीयांच्या आक्रमणापासून आपली प्राचीन मंदिरे सुरक्षित ठेवण्याचं महत्वाचं काम नागा साधूंनी केलं असल्याचे सांगितले जाते. संन्यासी कपडे घालून आणि निर्वस्त्रावस्थेतही ते तपस्या करतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.