आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव:नायलॉन मांजाने तरुण डॉक्टरचा गळा कापला;स्वत: जखम आवळून धरल्याने वाचला जीव

जळगाव12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एका रिक्षाचालकाने त्यांना रुग्णालयात पोहोचवले.

बंदी घातलेल्या नायलॉनच्या मांजाने एका तरुण डॉक्टरचा गळा कापला गेल्याची घटना शनिवारी घडली. स्वत: डॉक्टर असल्याने जखमी अवस्थेत अर्धा तास नस, श्वसननलिका त्यांनी दाबून धरली. अधिक रक्तस्राव होऊ दिला नाही. रुग्णालयापर्यंत तातडीने पाेहाेचल्याने उपचार होऊन त्यांचा जीव वाचला; परंतु हे डॉक्टर जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेले असताना १० मिनिटे लोकांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. त्यानंतर एका रिक्षाचालकाने त्यांना रुग्णालयात पोहोचवले.

डॉ. जवाद अहमद (२५, रा. सालारनगर) असे जखमी डॉक्टरचे नाव आहे. डॉ. अहमद हे मूळचे अमरावतीचे आहेत. वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते तांबापुरातील एका रुग्णालयात प्रशिक्षणार्थी डॉक्टर म्हणून काम करीत आहेत. शनिवारी सकाळी ११.३० वाजता डॉ. अहमद हे दुचाकीने (एमएच १९ एयू ६८१४) तांबापुराकडे निघाले होते. या वेळी महामार्गावरील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ एका खांबावर लटकत असलेला नायलॉनचा मांजा त्यांच्या गळ्यात अडकला. दुचाकी पुढे जाताच या मांजाची गाठ बसून डॉ. अहमद यांचा गळा कापला गेला. यामुळे ते दुचाकीसह जमिनीवर कोसळले. मांजामुळे गळा कापला गेल्याचे लक्षात येताच डॉ. अहमद त्यांनी कापल्या गेलेल्या नस, श्वसननलिका दाबून धरल्या. वैद्यकीय शिक्षण झालेले असल्यामुळे त्यांनी रक्तस्राव कमी प्रमाणात होईल अशा प्रकारे गळा दाबून धरला होता. या जागी सामान्य व्यक्ती राहिली असता तर तिचा अतिरक्तस्राव होऊन जागीच जीव गेला असता; परंतु जमिनीवर कोसळलेले डॉ. अहमद यांना मदत करण्यापेक्षा नागरिकांनी बघ्याची भूमिका घेतली. सुमारे दहा मिनिटे ते रस्त्यावर पडून होते. हा प्रकार ये-जा करणारे नागरिक पाहत होते. मात्र, तरीही कोणीही त्यांच्या मदतीला धावले नाही. अखेर कलीम शेख या रिक्षाचालकाने प्रसंगावधान राखून डॉ. अहमद यांना रिक्षात बसवून खासगी रुग्णालयात पोहोचवले. गळा कापला गेल्यापासून सुमारे ३० मिनिटांत डॉ. अहमद हे रुग्णालयात पोहोचले होते.

बातम्या आणखी आहेत...