आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावात भीषण अपघात:भरधाव ट्रक दुधाच्या दोन टॅंकरला धडकला, पाच जण जागीच ठार, मुक्ताईनगरजवळील घटना

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरजवळ राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात घडना घडली असून या अपघातात 5 जण ठार झाले आहेत. आज पहाटे 3 वाजेच्या सुमारास हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

प्राप्त माहितीनुसार, पवन सुदाम चौधरी (वय 25), धनराज बन्सीलाल पाटील (वय 48), धनराज सुरेश सोनार (वय 37), उमेश राजेंद्र सोळंके (वय 35), भालचंद्र गुलाब पाटील (वय 31) अशी मृतांची नावे आहे.

मुक्ताईनगरच्या घोडसगावाजवळ बंद पडलेल्या टँकरमधून दुसर्‍या टँकरमध्ये दुध टाकत असताना भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने टँकर्स आणि क्रेनला जोरदार धडक दिली. यामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिस तपास सुरू असल्याची माहिती आहे. अपघातात मृत्यू झालेले 4 धुळे जिल्ह्यातील असून 1 जळगाव येथील आहे. घटनेची माहिती मिळताच मुक्ताईनगर पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

घटनास्थळी मुक्ताईनगर पोलिस दाखल झाले असून, पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. पोलिसांकडून 5 मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. दरम्यान मृतांची नावे अद्याप कळू शकलेली नाही. मृतांमध्ये काही मजुरांचा समावेश असल्याचे समजते. पुढील तपास सुरू असल्याची माहिती आहे.

बातम्या आणखी आहेत...