आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील नवीन बसस्थानक जिल्ह्याचे ठिकाण आहे. दररोज येथून हजारो प्रवासी प्रवास करतात. मात्र, स्थानकात केवळ २२ खुर्च्यांच शिल्लक असल्याने प्रवाशांना मोठ्याप्राणात उभे राहण्याची शिक्षा मिळत आहे. त्यातच भर म्हणजे स्थानकातील केवळ चौकशी खिडकीवरील पंखाच सुरू असून इतर सर्वच्या १४ पंखे बंद पडले आहेत. त्यामुळे प्रवाशांसाठी यंदाचा उन्हाळा हा वनवासच ठरणार आहे.
उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. होळीनंतर उन्हाचा ताप वाढणार आहे. मुलांना लवकरच उन्हाळ्याची सुटी लागत असल्याने अनेक पालक सहलीचे नियोजन करत आहेत. तर काही मुले आजोळी जातात. तसेच याच काळात लग्नसराई देखील असल्याने जळगाव स्थानकातून दररोज हजारो प्रवाशांची ये-जा सुरू असते. मात्र, स्थानकातील प्रवाशांना बसण्याची खुर्च्या अतिषय तोकड्या आहेत.
मुळात संपूर्ण स्थानकात केवळ प्रवाशांसाठी एकूण ३९ खुर्च्या होत्या. या ३९ खुर्चींमधून आत केवळ २२ खुर्च्यांच सुस्थितीत आहे. इतर खुर्च्या नष्ट झाल्या आहेत. अशीच स्थित पंख्यांचीपण आहे. येथे एकूण १५ पंखे आहेत. यातील केवळ चौकशी खिडकीवरील पंखाच तेवढा सुरू असून इतर सर्व १४ पंखे बंद आहेत.
कर्मचारी माणसे मग आम्ही कोण?
बसस्थानकात केवळ बोटावर मोजण्याइतक्याच बसायला खुर्च्या आहेत. बरं सावलीत उभे रायचे म्हटले तरी येथे एकही पंखा सुरू नाही. स्थानकाच्या दोन्ही बाजूला लावले सर्व पंखे बंदच आहे. केवळ चौकशी खिडकीवरील पंखा तेवढा सुरू आहे. इतर पंखे बंद असल्याचे यांना दिसत नाही का? यांचा तेवढा पंख बरा सुरू असतो? ही माणसे आहेत आम्ही का जनावरं आहोत का? असा संतप्त प्रश्न छत्रपती संभाजीनगर येथील प्रवासी नंदन काळे यांनी उपस्थित केला.
पंखे दुरुस्तीची १५ दिवसांपूर्वीच मागणी
''बसस्थानकातील तीन पंख्यांशिवाय इतर पंखे बंदच आहेत. याबाबत १५ दिवसांपूर्वीच एसटीच्या बांधकाम विभागाकडे पंखे सुरू करण्याबाबत लेखी मागणी केली आहे. मात्र, अजूनही पंख्यांची दुरुस्ती झाली नाही. पंखे दुरुस्त करण्याबाबत पाठपुरावा करू.'' - मनोज तिवारी, स्थानक प्रमुख.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.