आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • Jalgaon News, Minor Siblings Murder Case Update : Police Handcuffed Three Accused, Confessed To Raping The Eldest Daughter; The Dog Reached Out To The Accused

जळगाव हत्याकांड प्रकरण:पोलिसांनी तीन आरोपींना ठोकल्या बेड्या, मोठ्या मुलीवर बलात्कार केल्याची कबुली दिली; श्वानाने आरोपींपर्यंत पोहोचवले

जळगाव2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्याचे गृहराज्यमंत्री अनिल देशमुख यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली आणि आरोपींविरोधात कठोर कारवाईचे आश्वासन दिले

जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील बोरखेडा गावातील हत्याकांड प्रकरणी पोलिसांनी शनिवारी 3 आरोपींना अटक केली. आरोपींनी अगोदर तीन मुलांचा खून केला आणि नंतर मोठ्या मुलीसोबत बलात्कार करुन तिची हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तिन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. या प्रकरणी तीन आरोपींना अटक केल्याची पुष्टी जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली.

पालकमंत्र्यांनी त्यांच्या अटकेची पुष्टी केली

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली आणि आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. पोलिसांनी सांगितले, की, अटक करण्यात आलेले सर्व आरोपी आदिवासी समाजातील असून सर्व 21 ते 23 वयोगटातील आहेत. या आरोपींनी कथितरित्या कुऱ्हाडीने चिमुकल्यांचा खून केला होता.

अशाप्रकारे आरोपींपर्यंत पोहोचले पोलिस

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, याप्रकरणात 'जंजीर' नावाच्या श्वानाकडून बरीच मदत मिळाली. पोलिसांनी या श्वानाला कुऱ्हाडीचा वास दिला आणि त्याच्या पाठोपाठ रावरे-बऱ्हाणपूर मार्गावर स्थित एका लॉजवर पोहोचले. लॉजवरून पोलिसांनी 5 जणांना ताब्यात चौकशी केली. यातील तिघांनी आपला गुन्हा कबुल केला. रविवारी या संदर्भात पोलिस पत्रकार परिषद घेऊ शकतात.

आरोपींनी अशी घटना घडवून आणली

पोलिस सूत्रांनुसार, रात्री मुले झोपेत असताना आरोपींनी खिडकी तोडून घरात प्रवेश केला आणि 14 वर्षीय मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान तिच्या भावंडे जागी झाली आणि त्यांनी आरोपींना थांबवण्याचा प्रयत्न केला. यानंतर आरोपींनी एक-एक करत तिघांची हत्या केली आणि आळीपाळीने 14 वर्षीय मुलीवर बलात्कार केला. बलात्कारानंतर आरोपींनी तिचीही हत्या केली आणि तेथून फरार झाले.

शुक्रवारी पहाटे घडलेल्या या घटनेत आरोपींनी 2 मुले व 2 मुलींची हत्या केली. त्यांचे वय 3 ते 12 वर्षाच्या दरम्यान आहे. या चौघांचे मृतदेह शेतात आढळले होते. थोरल्या मुलीच्या अंगावर कपडे नव्हते. शुक्रवारी माजी मंत्री गिरीश महाजन आणि रावेरचे खासदार रक्षा खडसे यांनी मोठ्या मुलीची बलात्कारानंतर हत्या झाल्याची भीती व्यक्त केली होती.

नातेवाईकाच्या अत्यंविधीसाठी आई-वडील मध्य प्रदेशात गेले होते

शुक्रवारी सकाळी एका शेतकऱ्याने शेतात चौघांचे मृतदेह पाहिल्यानंतर या घटनेचा खुलासा झाला. मुलांचे पालक मूळचे मध्य प्रदेशातील खरगोन येथील आहेत आणि नातेवाईकाच्या निधनानंतर ते त्यांच्या वडिलोपार्जित गावी गेले होते. घटनेची माहिती मिळताच ते शुक्रवारी सकाळी कारमधून रावेर आले.

बातम्या आणखी आहेत...