आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात हेच खरे. अंध अॅड. हरिहर पाटील (वय 61) व अविवाहित मीना चौधरी (वय 59) यांच्या विवाहाने याला बळकटी मिळाली आहे. हा विवाह अॅड. हरिहर यांच्या दोन मुलींच्या पुढाकाराने तसेच संत गाडगेबाबा शहरी बेघर निवारा केंद्राच्या साक्षीने 3 मार्च रोजी होत आहे. या विवाहाच्या 15 दिवसांनंतर अॅड. हरिहर पाटील यांच्या दुसऱ्या मुलीचा विवाह 18 मार्चला होणार आहे. आपण गेल्यानंतर वडिलांचे काय? या काळजीपोटीच दोघा बहिणींनी पित्यासाठी मीना चौधरी यांच्या रूपाने आयुष्यभराचा भक्कम आधार मिळवून दिला आहे.
मीना ह्या गेल्या चार वर्षांपासून संत गाडगेबाबा शहरी बेघर निवारा केंद्रात आपल्या आईसह राहत होत्या. आईचे 95 व्या वर्षी येथेच निधन झाले. या आईची सेवा व काळजीपोटी मीना यांनी आतापर्यंत विवाहच केला नव्हता. तर अॅड. हरिहर पाटील (धरणगाव) यांच्या पत्नीचे डिसेंबर महिन्यात निधन झाले होते. त्यांना मुलगा नाही इरावती व सुवर्णा नावाच्या दोन मुली आहेत.
इरावती नावाच्या मुलीचे आधीच लग्न झाले तर 18 मार्चला सुवर्णा या मुलीचे लग्न होत आहे. आपल्या लग्नानंतर वडिलांची काळजी कोण घेईल? या प्रश्नाने दोघा बहिणींनी पित्याचे लग्न जमवण्यातही पुढाकार घेतला. त्यामुळेच सुवर्णाच्या लग्नाच्या 15 दिवस आधीच वडिलांना मीना यांच्या रूपाने जीवनाचा आधार मिळवून दिला.
समुपदेशनाने मिळवला मीना चौधरींचा होकार
आपल्या लग्नानंतर आईची काळजी कोण घेईल? तसेच आईची सेवा करण्याच्या विचाराने मीना चौधरी यांनी विवाह केला नव्हता. त्यांच्या आईचेही काही महिन्यांपूर्वीच निधन झाले. दरम्यान, त्या जॉबही करत होत्या. हरिहर पाटील यांनी देखील बेघर निवाऱ्यातील एखाद्या बेघर महिलेशी विवाहास संमती दर्शवल्यानंतर आपण आधार देऊ शकतो. त्यानंतर संत गाडगेबाबा शहरी बेघर निवारा केंद्रातील काही महिलांशी बोलल्यानंतर तसेच मीना चौधरी यांचे समुपदेशन केल्यानंतर त्यांनी या विवाहाला होकार दिला. या विवाहासाठी दोघा मुलींसह आयुक्त विद्या गायकवाड, उपायुक्त गणेश चाटे, शहर अभियान व्यवस्थापक गायत्री पाटील-महाले यांनी पुढाकार घेतला.
मुली व पत्नीच्या इच्छेखातर विवाह
हरिहर पाटील यांच्या पत्नीचे डिसेंबर महिन्यात निधन झाले. तर एका मुलीचे आधीच लग्न झाले आहे. तर दुसऱ्या मुलीचा विवाह 18 मार्चला होत आहे. या विवाहानंतर हरिहर पाटील यांना आधार राहणार नाही. तसेच आपल्यानंतर पतीचे हाल व्हायला नको, म्हणून त्यांनी दुसरा विवाह करायला हवा, अशी पत्नीची शेवटीची इच्छा होती. रूपाली यांच्या विवाहाच्या आधी पित्याला आधार मिळायला हवा यासाठी दोन्ही मुलींच्या पुढाकाराने हा विवाह 3 मार्च रोजी होत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.