आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुटुंबियांचा गोंधळ:नातेवाईक गोळा झाले, अंत्ययात्रेची तयारीही झाली, स्वर्गरथ दारात उभा अन् वृद्धाने अचानक घेतला श्वास, जळगावातील घटना

जळगाव10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मृत समजून अंत्ययात्रेची तयारी झाल्यानंतर वृद्धाने अचानक घेतला श्वास, हिराशिवा कॉलनीतील गैरसमजातून घडली घटना

हिराशिवा कॉलनीतील वृद्धाला प्रकृती गंभीर असल्याने सारा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेले होते. बुधवारी सकाळी वृद्ध ब्रेन डेड अवस्थेत चालला असून काही तासांचाच सोबती असून घरी जावून सेवा करा, असा सल्ला डॉक्टरांनी दिला. नातेवाइकांनी ब्रेन डेड ऐवजी डेड असे ऐकल्याने झालेल्या गैरसमजातून गोंधळ उडाला. वृध्द मृत झाल्याबाबत सर्व नातेवाइकांना निरोप देण्यात आला. स्वर्गरथ बोलावून अंत्ययात्रेची तयारीही करण्यात आली. या दरम्यान, वृध्दाने जोरात श्वास घ्यायला सुरुवात केली. त्यांचे हृदय सुरु असल्याचे लक्षात आल्यानंतर अंत्ययात्रा अर्ध्यावरच थांबवण्यात आली.

राजेंद्र सीताराम सोनवणे (वय ६२, रा. हिराशिवा कॉलनी) असे त्या वृद्धाचे नाव आहे. त्यांच्यावर यापूर्वी हृदय शस्त्रक्रिया झालेली आहे. फीट येत असल्याच्या संशयावरून नातेवाइकांनी बुधवारी त्यांना सारा हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. डॉक्टरांनी सोनवणे हे ब्रेन डेड अवस्थेत चालले असून काही तासांचेच सोबती असल्याचे नातेवाइकांना सांगितले. नातेवाइकांनी ब्रेन डेड ऐवजी डेड असे ऐकले. त्यामुळे भांबावलेल्या नातेवाइकांनी तसाच निरोप इतर नातेवाइकांना दिला. सोनवणे यांचा अमेरिकास्थित मुलगा व सून वगळता नातेवाइक सोनवणे यांच्या घरी अंत्ययात्रेसाठी आले. सकाळी ११ वाजता अंत्ययात्रेची सर्व तयारी सुरु झाली. स्मशानभूमीत नेण्याची तयारी करीत असताना सोनवणे यांचा श्वास व ह्रदय सुरु असल्याचे नातेवाइकांच्या निदर्शनास आले. त्यानंतर गोंधळ उडाला. अंत्ययात्रेची तयारी थांबवण्यात आल्याचे नातेवाइक व शेजाऱ्यांनी सांगितले. रात्री ११ वाजेपर्यंत सोनवणे यांचा श्वास सुरु होता.

बातम्या आणखी आहेत...