आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावात गाळ माफियांची 'भाई'गिरी:जळगावात धरणातून अवैध गाळ काढताना विचारपूस केल्याने वनरक्षकास मारहाण; गुन्हा दाखल

जळगाव23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

धरणातून गाळ काढत असलेल्या माफीयांना हटकल्याचा राग आल्याने त्यांनी थेट वनरक्षकास मारहाण करुन जीवेठार मारण्याची धमकी दिली. आठ जून रोजी चोपडा तालुक्यातील कृष्णापूर जवळ ही घटना घडली. विपुल पाटील असे जखमी वनरक्षकाचे नाव असून या प्रकरणी शुक्रवारी रात्री उशिरा शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. .

घटना अशी की, चोपडा तालुक्यातील मामलदा वनक्षेत्रातील कक्ष क्रमांक 259 मध्ये बोरवाय धरण आहे. धरण वनविभागाच्या अधिपत्त्याखाली असल्यामळे त्यातून गाळ काढण्यास बंदी आहे. असे असताना आठ रोजी रात्री 12 वाजता रितेश उर्फ नितीन हरचंद धनगर याच्यासह काही जण धरणातून गाळ काढत होते. याचवेळी वनरक्षक पाटील हे या भागात गस्त करीत होते. त्यांना धरणातून गाळ काढताना काही लोक दिसून आले. यामुळे पाटील यांनी त्यांना हटकले. याचा राग आल्यामुळे रितेश धनगर याने थेट पाटील यांना शिवीगाळ मारहाण केली.

माफियांकडून वनरक्षकाला धमकी

‘तुला रोज जंगलात यावे लागते, यानंतर मी तुझे काय करेल पाहुन घे’ असे म्हणत जीवेठार मारण्याची धमकी दिली. यामुळे भेदरलेल्या पाटील यांनी थेट चोपडा ग्रामीण पोलिस ठाणे गाठले. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शासकीय कामात अडथळा आणला, मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक देविदास कुनगर तपास करीत आहेत.

गाळ माफियांची 'भाई'गिरी

जिह्यातील सर्व नदीपात्रातून वाळूचोरी सुरू आहे. वाळू माफियांकडून तलाठी, तहसीलदारांना धमक्या दिल्या जात आहेत. आता धरणातील गाळचोरीवरून माफियागिरी समोर आली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

बातम्या आणखी आहेत...