आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव:ट्रॅक्टर पलटी झाल्याने दबून तरुणाचा जागीच मृत्यू, चोपडा तालुक्यातील धक्कादायक घटना

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चोपडा तालुक्यातील सुटकार शेतशिवारात चढावर ट्रॉलीसह ट्रॅक्टर चढत असताना ट्रॅक्टर अंगावर उलटल्याने ३५ वर्षीय तरुण प्रभाकर ठाकरे याचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना आज (शुक्रवारी) दुपारी २.३० वाजेच्या सुमारास सुटकार येथे घडली.

तालुक्यातील सुटकार येथील रहिवासी असलेले प्रभाकर रामचंद्र ठाकरे (35) हे तालुक्यातील वडती येथून सुटकार येथील शेतात कांद्याचे रोप ट्रॅक्टरमधून घेऊन जात होते. कांद्याचे रोप असलेले ट्रॅक्टर सुटकार शेतशिवारातील चढवावर चढत असताना अचानक प्रभाकर ठाकरे यांच्या अंगावर उलटल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात दोन मुलं, पत्नी, आई, भाऊ, बहीण असा परिवार आहे. ग्रामीण पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...