आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नुकसानीची पाहणी:माजी मंत्री अरुण गुजराथींनी शेतकऱ्यांच्या नुकसानीची केली पाहणी; वयाच्या 80 व्या वर्षी मोटार सायकलीवर जाऊन केली पाहणी

चोपडा17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हातेड, धुपे, भार्डु या तिन्ही गावात शेतकऱ्यांचे पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

चोपडा तालुक्यातील हातेड, धुपे, भार्डु या परिसरात झालेल्या चक्रीवादळात शेतकऱ्यांचे केळी बागा व आठ दिवसांपूर्वी लागवड केलेल्या कापसाची शेती अक्षरशा वाहून गेली आहे. या नुकसानीची पाहणी आज माजी मंत्री अरुण गुजराथी यांनी केली. तसेच शेतकऱ्यांना एक प्रकारे धीर देण्याचा प्रयत्न केला आहे.

तालुक्यातील हातेड, धुपे, भार्डु या तिन्ही गावात शेतकऱ्यांचे पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यानंतर आज माजी मंत्री अरुण गुजराथी यांनी धुपे येथील 80 टक्के नुकसान झालेल्या केळी उत्पादक शेतकरी वसंत पिरन पाटील यांच्या शेतात जाऊन पाहणी केली. त्यावेळी शेतकरी वसंत पाटील यांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले होते. यावेळी अरुण गुजराथी यांनी वसंत पाटील यांना धीर दिला होता.

धुपेनंतर भार्डु गावात जाऊन शेतीचे नुकसानीची पाहणी केली होती. यावेळी चोसाका संचालक आनंदराव रायसिंग, शेतकी संघाचे माजी चेअरमन साहेबराव पाटील,माजी उपसरपंच मिलींद पाटील,धुपे येथील भाऊसाहेब पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना अरुण गुजराथी यांनी सांगितले की, कोकणाला जसे नुकसानीचे दर दिले तसे दर खान्देशाला देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आपण मागणी करणार आहोत. तर तालुक्यात अनेक गावांमध्ये केळी उत्पादक शेतकरी बांधवांना केळी पीक विमा कसा लवकर मिळेल यासाठी देखील आपण प्रयत्न करणार आहोत.

नुकसानीची पाहणी केली मोटार सायकलीने
विधानसभा माजी अध्यक्ष तथा माजी मंत्री अरुण गुजराथी यांनी भार्डु गावच्या शेतकऱ्यांची शेती पाहण्यासाठी अर्धा किमी अंतर मोटार सायकलिवर जाऊन शेताच्या बांधावर पाहणी केली. यावेळी शेतकरी मिलिंद पाटील, साहेबराव पाटील यांनी सांगितले की, आम्ही असा पहिला नेता पाहतो आहे की, 80 व्या वर्षात देखील शेताच्या बांधावर शेतकऱ्याचे दुःख जाणून घेण्यासाठी अरुण गुजराथी आले आहेत. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना अरुण गुजराथी यांनी सांगितले की, आपल्याने जेवढं होत तेवढे करून पाठपुरावा करून मदत मिळवून देण्यासाठी काम मी करत असतो.

नुकसान पाहून झाल्यानंतर अरुण गुजराथी यांनी सांगितले की, शेतकऱ्यांचे खूप मोठं नुकसान झाले आहे. मी स्वतः जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेशी संपर्क करणार आहे. ज्या विमा कंपनीनी केळी पीक विमा काढले आहेत त्यांच्याशी देखील संपर्क करून मदत कशी मिळवून देता येईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...