आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'एनए'चा गोलमाल:जळगावमध्ये बनावट कागदपत्रांवरून प्लॉट विक्री; पाच लाखांचा घातला गंडा

जळगाव19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिगर शेती म्हणजेच एनए न झालेल्या प्लॉटचे बनावट कागदपत्र तयार करून, एका तरुणाला पाच लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार अंमळनेरमध्ये उघड झालाय. या प्रकरणी शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेंद्र दगडू सोनवणे (वय २६, रा. अंमळनेर) असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्यांच्या तक्रारीवरून चंद्रकांत तोताराम पाटील (वय ५६, रा. देवपूर, धुळे) विरुद्ध फसवणूक झाल्याची फिर्याद नोंदवण्यात आली आहे.

नेमके प्रकरण काय?

घटना अशी की, पाटील यांची अमळनेर शहरात भालेरावनगर ड्रीम सीटीजवळ जागा आहे. ही ५५० चौरस फूट जागा १० लाख ८९ हजार रुपयात जितेंद्र सोनवणे यांना विक्री करण्याचे ठरले. त्यापोटी सोनवणे यांनी पाच लाख रुपयांचा अ‌ॅडव्हान्स दिला. दरम्यान, जागा बिनशेती केलेली नसल्याचे सोनवणे यांच्या लक्षात आले.

पैसे देण्यास टाळाटाळ

सौदा करतेवेळी पाटील यांनी खोटे, बनावट कागदपत्र दाखवून पाच लाख रुपये घेतल्याचे निदर्शनास आले आहे. हे पैसे परत मागितले असता पाटील यांनी परत करण्यास टाळाटाळ केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अखेर सोनवणे यांनी अंमळनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस नाईक आलोक साबळे तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...