आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

अपघात:विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकरांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात, दोन्ही नेते सुखरूप

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यातील एका गाडीला बुधवारी रात्री जळगाव येथे अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. एका वृत्तवाहिणीने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-नागपूर महामार्गावर नशिराबाद येथे हा अपघात झाला. दरम्यान, सर्वजण सुखरूप असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्वीटरवरुन दिली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी आज नाशिक जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी मालेगाव येथील कोव्हिड रूग्णालयाला भेट देऊन वैद्यकीय अधिकार्‍यांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी जळगावकडे निघाले होते. त्याचवेळी गाडीचा ब्रेक फेल झाल्याने ताफ्यातील एका गाडीने पुढे असणाऱ्या दरेकर यांच्या गाडीला धडक दिली. यामध्ये गाडीचे नुकसान झाले. यात देवेंद्र फडणवीस आणि अन्य सर्व सुखरुप असल्याची माहिती आहे. जळगावमध्ये उद्या या दोन्ही नेत्यांचा दौरा आहे. ते जळगावमधील रुग्णालयांना भेट देऊन करोना व्हायरसच्या स्थिती संदर्भात माहिती घेणार आहेत.

0