आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘झाडांची भिशी’ वाढवणार अाॅक्सिजन बँकेच्या ठेवी:जळगावात डाॅक्टर, इंजिनिअर, उद्याेजकांचा उपक्रमात सहभाग; पैसे नसल्यास खड्डे खणण्याचे काम

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षलागवड हाच महत्त्वाचा उपाय अाहे. ही बाब हेरून जळगाव शहरातील संशाेधनदृष्टी असलेल्या काही डाॅक्टरांनी एकत्र येऊन ‘झाडांची भिशी’ हा अनाेखा उपक्रम हाती घेतला अाहे. त्यातून निसर्गनिर्मित अाॅक्सिजन बँकेच्या ठेवी वाढण्यास अापसूक मदत हाेईल. दागिने, पैसे अाणि पुस्तकांची भिशी सर्वांना ठाऊक अाहे, पण ‘झाडांची भिशी’ हा अभिनव असा उपक्रम शहरात अाकाराला अाला अाहे. सुरुवातीला त्यात डाॅ. नितीन चाैधरी, डाॅ. जयंती चाैधरी, डाॅ. पराग चाैधरी, डाॅ. संजय पाटील यांनी पुढाकार घेतला. अाता त्यात ३५ सदस्य अाहेत. प्रत्येकाकडून दरमहा ५०० रुपये घेऊन ड्राॅ काढले जातात. ज्यांच्या नावाचा ड्राॅ निघाला त्यांच्या पसंतीची याेग्य वाढ झालेली राेपे खरेदी केली जातात. ५ फूट उंच जाळीचे ट्री गार्डही खरेदी होते. ज्याची भिशी निघाली त्या सदस्याचे घर, बंगल्याच्या अावारात ही राेपे लावली जातात. समजा तेथे जागा नसली तर सार्वजनिक ठिकाणी ती लावली जातात.

पाण्यासाठी टँकरची व्यवस्था करणार

  • भिशीतून रोपे खरेदी करायची. कुणी पैशांशिवाय सहभागी होणार असल्यास त्यांनी खड्डे खाेदून द्यायचे.
  • गरजेनुसार वर्षातून दोनदा खत देणार. उन्हाळ्यात टँकरने पाणी देण्यासाठी रकमेचे नियाेजन करण्याला प्राधान्य.
  • उपक्रमांतर्गत राेपे शक्यतोवर सरकारी अथवा नगरपालिकांच्या किंवा मोठ्या संस्थांच्या जागेत लावणार.
  • लावलेल्या राेपांची महिन्यातून दाेनदा तपासणी हाेईल. राेप रुजले नाही तर त्या ठिकाणी दुसरे राेप लावणार.

खुल्या भूखंडांवर हिरवाई
उपक्रमात सहभागी हाेणाऱ्यांची संख्या वाढत अाहे. ही बाब लक्षात घेऊन मनपा मालकीचे खुले भूखंड, उद्यानांत या अंतर्गत राेपे लावण्याचे नियाेजन करण्यात येते अाहे. प्रशासनाने सुचवलेल्या जागांवर, माळरानावर या माध्यमातून हिरवाई फुलवण्याचा निर्धार सदस्यांनी केला अाहे.

उपक्रमाचा एक प्रेरणास्राेत
साेलापुरात डाॅ. सचिन पुराणिक यांनी तीन वर्षांपूर्वी झाडांची भिशी उपक्रम सुरू केला. राज्यभरात वेगवेगळे ग्रुप तयार झाले. लावलेल्या राेपांना एक वर्ष झाल्यानंतर त्यांचा वाढदिवसही साजरा केला जाणार अाहेे.

बातम्या आणखी आहेत...