आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजळगाव जिल्ह्यातून दोन धाम यात्रेला भाविकांना घेवून गेलेली ट्रॅव्हल बस क्रमांक ( जीजे 05 बीएक्स 3438) ओडिसा राज्याच्या सीमेजवळील सोहला गावाजवळ रस्त्याच्या कडेला उभी असताना बसला सिमेंटच्या गोण्या भरलेल्या ट्रकने मागून धडक दिली. शनिवारी मध्यरात्री एक वाजता हा अपघात झाला आहे. या बसमध्ये सर्वाधिक जळगाव जिल्ह्यातील 31 प्रवासी हाेते. त्यातील शहरातील बळीराम पेठेतील महिला किरकाेळ जखमी झाली असून ती वगळता उर्वरित 30 प्रवासी सुखरुप आहेत.
जळगाव येथून गुजरातमध्ये नोंदणी असलेल्या गंगोत्री ट्रॅव्हल्स द्वारा आसाम, नेपाळ, गंगासागर जगन्नाथ पुरी, उज्जैन, वाराणसी, कामाख्या देवी या तीर्थस्थळांना भेट देण्यासाठी जळगाव येथून एकूण 49 भाविक गेले आहेत. या भाविकांमध्ये नेपानगर येथील 7, औरंगाबाद 4, पुणे मुंबई व सोलापूर प्रत्येकी 2 आणि जळगाव जिल्ह्यातील 31 प्रवासी होते. यापैकी जिल्ह्यातील सर्व यात्रेकरी सुखरूप असून श्रीमती मंगलाबाई पाटील, बळीराम पेठ, जळगाव यांना किरकोळ दुखापत झालेली आहे.
मुख्यमंत्र्यांचा पालकमंत्री पाटील यांच्याशी संपर्क…
या अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचेशी संपर्क साधून माहिती दिली. पालकमंत्री श्री. पाटील त्यांनी तत्काळ जिल्हाधिकारी, जळगाव यांना सदर घटनेबाबत माहिती देऊन अपघातग्रस्त नागरिकांना मदत कार्य करण्याबाबत सूचना दिल्या. त्यानुसार जिल्हाधिकारी, जळगाव यांनी त्वरीत संबलपुर आणि बारलगढ जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधला आणि सर्व अपघाग्रस्तांना मदत कार्य करणेबाबत सूचित केले. यात्रेच्या आयोजक शोभा पाटील (रा. जळगाव) या जिल्हा प्रशानाच्या सूचनेनुसार रात्रीच संबलपूर येथे रवाना झाल्या आहेत.
प्रशासनाने केले नियंत्रण कक्षाचे क्रमांक जाहिर..
अधिक माहितीसाठी संपर्क जिल्हाधिकारी कार्यालय नियंत्रण कक्ष 0257-2217193/2223180 अथवा
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी मोबईल क्रमांक 9373789064 येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.