आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हद्दपार महिला थेट पोलिस ठाण्यात:फिर्याद देण्यासाठी आलेल्या हद्दपार महिलेवर जळगाव पोलिसांकडून गुन्हा दाखल

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दरोडा, जबरीलुट, मारहाण, चोरी या सारख्या गंभीर गुन्ह्यात हद्दपार केलेली एक सराईत महिला गुन्हेगार शनिवारी रात्री रामानंदनगर पोलिस ठाण्यात एका प्रकरणात फिर्याद देण्यासाठी आली. दरम्यान, शहरात येण्यास बंदी असतानाही तीने प्रवेश केल्यामुळे पोलिसांनी तीच्यावर आणखी एक गुन्हा दाखल केला आहे.

कल्पनाबाई हिरामण जगताप (रा. लाकुडपेठ, शिवाजीनगर), असे या महिलेचे नाव आहे. कल्पनाबाईसह तीचा मुलगा व मुलगी या दोघांना देखील शहरातून हद्दपार केले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कल्पनाबाई फुले मार्केट परिसरात फळ विक्रीचा व्यवसाय करीत होती. या ठिकाणी तीने स्थानिक व्यापारी, विक्रेत्यांशी अनेकवेळा भांडण केले. दरोडा, जबरीटुलीसारख्या गुन्ह्यात ती संशयित आहे. आठ पेक्षा जास्त गंभीर गुन्हे तीच्या विरुद्ध दाखल असल्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेने चौकशी करुन तीच्या हद्दपारीचा प्रस्ताव तयार केला. 13 ऑगस्ट 2021 पासून कल्पनाबाई हिला एक वर्षासाठी शहरातून हद्दपार करण्यात आले आहे. दरम्यान, एका प्रकरणात तीला फिर्याद द्यायची असल्यामुळे ती शनिवारी रात्री रामानंदनगर पोलिस ठाण्यात पोहोचली. पोलिसांच्या परवानगी शिवाय शहरात आल्यामुळे तिच्यावर हद्दपार कारवाईचे उल्लंघन केल्याचा गुन्हा शहर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. पोलिस हेड कॉन्स्टेबल विजय निकुंभ तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...