आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादोन वर्षांपूर्वी पोलिस रायझिंग डेनिमित्त आयोजित प्रदर्शनातून एक पिस्तूल गहाळ झाले होते. या संदर्भात रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे पिस्तूल अद्याप मिळुन आले नाही. या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून यंदा प्रदर्शनात निवडक शस्त्र प्रदर्शनात ठेवण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांना दोन-तीन फुट लांब अंतरावरुन शस्त्र दाखवण्यात येणार आहेत.
महाराष्ट्र पोलिस स्थापना दिनानिमित्त जळगाव जिल्हा पोलिस दल, भंवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने काव्यरत्नावली चौक जळगाव येथे बुधवारी शस्त्र, श्वान, बॉम्ब शोधक व नाशक, पोलिस बॅन्ड, वायरलेस इत्यादींचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी अमन मित्तल, पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या हस्ते हवेत तिरंगे फुगे सोडून प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी अप्पर पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी, पोलिस उप अधीक्षक (गृह) संदीप गावित, युवाशक्ती फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विराज कावडीया आदी उपस्थित होते. विविध शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, एनसीसी व एनएसएसचे कॅडेट उपस्थित होते. जिल्हाधिकारी अमन मित्तल, पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. चंद्रकांत गवळी यांनी प्रास्ताविक करून महाराष्ट्र पोलिस स्थापना दिवसाचा इतिहास मांडला तर संदीप गावित यांनी आभार मानले. कावडीया यांनी आयोजनाची भुमकी स्पष्ट केली. अमीत माळी यांनी सुत्रसंचालन केले. सर्व पोलिस ठाण्यांचे निरीक्षक या प्रदर्शनाला हजर होते. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी आरपीआय संतोष सोनवणे, मंगल पवार, ड्रील इन्स्ट्रक्टर देविदास वाघ, डी.वाय. मराठे, दिपक पाटील, हरीष कोळी, राजेंद्र वाघ, किरण सपकाळे, आदींनी सहकार्य केले.
--------
ही शस्त्रे ठेवली प्रदर्शनात
प्रदर्शनात एके ४७, एसएलआर रायफल, कारबाईन ९ एमएम, अश्रुधूर साठा, पम्प अॅक्शन, ९ एमएम पिस्टल, ग्लॉक पिस्टल, रिव्हॉलर, श्वान पथकातील डाॅबरमॅन व लॅबेडर प्रजातीचे श्वान, वायरलेस प्रणाली, दंगानियंत्रण पथकातील कमांडो, इन्सास रायफल आदी पोलिस हाताळत असलेले शस्त्र व यंत्रणेचे प्रदर्शनात समावेश हाेते.
--------
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.