आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजळगाव रेल्वे यार्डात मेगाब्लॉकदरम्यान कनेक्टिव्हिटी, विद्युतीकरण, सिग्नल यंत्रणेसह तांत्रिक कामे करण्यात आली आहेत. यामुळे चौथ्या लाइनमुळे मालगाड्या-पार्सल अन् एक्सप्रेसचा मार्ग वेगळा होणार आहे.
तसेच गुजरात, मध्य प्रदेशसह मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांची संख्या अधिक असल्याने या चौथ्या लाइनमुळे पहिल्या व दुसऱ्या लाइनवरून एक्सप्रेस तर तिसऱ्या व चौथ्या लाइनवरून मालगाड्या व पार्सल मार्ग मोकळा होणार आहे. यामुळे गर्दीच्या मार्गात प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्यास मदत होणर आहे.
उद्या पण असणार मेगा ब्लॉक
जळगाव स्टेशनच्या यार्डात भुसावळ रेल्वे प्रशासनातर्फे सोमवारी सकाळी 8.25 वाजता ब्लॉकला सुरुवात करण्यात आली. मात्र, हा ब्लॉक सलग 36 तासांचा नसल्याने अधून-मधून अप व डाऊन मार्गावरून धिम्या गतीने वाहतूक सुरू असल्याचे दिसून आले. हा ब्लॉक मंगळवारीही सायंकाळपर्यंत सुरू राहणार आहे. या ब्लॉकमुळे अनेक पॅसेंजरसह एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्याने सर्वसामान्य प्रवाशांचे हाल झाले.
सर्वसामान्य प्रवाशांचे हाल
भुसावळ इगतपुरी मेमो, नंदुरबार एक्सप्रेस, नवजीवन एक्सप्रेस, ताप्तीगंगा, अमरावती सुरत, पुरी-ओखा-द्वारका, बंगळुरू-अहमदाबाद, सुरत-भुसावळ, देवळाली-भुसावळ आदी अप-डाऊन मार्गावरील गाड्या रद्द झाल्याने सर्वसामान्य प्रवाशांचे हाल झाले. यात अनेक प्रवाशांनी तिकीट खिडकी रूममध्येच विश्रांतीसाठी डेरा टाकला.
वाहतुकीस सुटसुटीतपणा येईल
भादली-जळगावदरम्यान गेल्या वर्षभरापासून भादली ते जळगावदरम्यान चौथ्या रेल्वे मार्गाचे काम हाती घेण्यात आले. यात भादलीपासून जळगाव रेल्वे स्थानकादरम्यान रूळ टाकण्यात आले आहेत. मात्र, रुळांची जोडणी व सिग्नल यंत्रणेचे काम अपूर्ण होते. हेच काम या ब्लॉकदरम्यान करण्यात येत आहे. या चौथ्या लाइनमुळे गाड्या सुरळीत होणार आहेत.
- डॉ. शिवराज मानसपुरे, वरिष्ठ मंडळ प्रबंधक
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.