आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील रामानंदनगर हे एकमेव पाेलिस ठाणे स्वत:च्या इमारतीत नाही. जिल्हा पाेलिस अधीक्षकांनी जागेची मागणी केल्यानंतर जागा निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ती अंतिम टप्प्यात अाहे. मेहरुणमधील ४८३/२ या गटात जागा ठरवण्यात येत अाहे. जागेची माेजणीही करण्यात अाली अाहे.
दरम्यान, निश्चित करण्यात येणारी जागा ही रामानंद पाेलिस ठाण्याच्या हद्दीच्या सुमारे एक किलाेमिटर बाहेर अाहे. तसेच हद्दीतील सर्वात संवेदनशिल प्रिंप्राळा हुडकाेत कायम दंगली, हाणामारी हाेतात. तेथे पाेहचण्यास पाेलिसांना अाताच्या ठाण्यापेक्षा दुप्पट अंतर जावे लागेल. रामानंदनगर पाेलिस ठाणे हद्दीत पिंप्राळा हुडकाे, समतानगर, वाघनगर, हरिविठ्ठलनगर अादी भाग उतरत्या क्रमाने संवेदनशिल अाहे.
सर्वाधिक पिंप्राळा हुडकाे संवेदनशील अाहे. त्या ठिकाणी गेल्या वर्षभरात चार दंगली झाल्या अाहेत. त्याचबराेबर हाणामारीच्या घटना तर नेहमीच घडतात. हाणामाऱ्यांचे रुपांतर दंगलीत हाेऊ नये यासाठी जलद गतीने जादा कुमक घटनास्थळी पाेहचणे महत्वाचे ठरते. सद्यस्थितीत काेल्हे नगरात असलेले रामानंदनगर पाेलिस ठाणे ते हुडकाेपर्यंतचे अंतर ३.६ किलाेमिटर अाहे. जर पाेलिस ठाणे मेहरुणमध्ये गेले तर हे अंतर दुपटीने वाढून ७ किलाेमीटर हाेईल. त्यामुळे पाेलिसांची जादा कुमक घटनास्थळी पाेहचण्यास वेळ लागेल. ही बाब हरिविठ्ठलनगर, खंडेरावनगर अादी भागाबाबत काही प्रमाणात लागू हाेते.
चारही चाैक्या कायम बंदच
रामानंदनगर पाेलिस ठाण्याच्या हद्दीत रामानंदनगर बसस्टाॅप, पिंप्राळा हुडकाे, महाबळ काॅलनी शेजारी अाणि डी-मार्ट समाेर अशा चार पाेलिस चाैक्या उभारण्यात अाल्या अाहेत. मात्र, त्या कायम बंद असतात. तेथे कायमस्वरुपी पाेलिसांची नियुक्ती नसल्याने घटना घडली तर पाेलिसांना पाेहाेचण्यासाठी विलंब हाेताे.
हद्दीच्या बाहेर पाेलिस ठाणे गेल्यास लांब व गैरसाेयीचे असल्याने सामान्य नागरीक तेथपर्यंत जावून तक्रार देण्यास नाखूष असतील. त्यामुळे पाेलिस ठाण्याच्या डायरीवर दाखल गुन्ह्यांची संख्या घटल्याचे दिसेल. परंतु, प्रत्यक्ष नियंत्रण नियंत्रण कमी झाल्याने गुन्ह्यांची संख्या वाढेल. ते कायदा सुव्यवस्थेला बाधक ठरेल. पाेलिस ठाणे हद्दीत येणाऱ्या संवेदनशील भागात पाेहाेचण्यासाठीचा वेळही वाढण्याची शक्यता अाहे.
महाविद्यालये पडतील दूर
गुन्हेगारी साेबत कायदा व सुव्यवस्था राखण्यात पाेलिसिंग ही महत्वाची बाब असते.अाताच्या रामानंदनगर पाेलिस ठाण्याच्या अर्धा ते पाऊण किलाेमिटरच्या अंतरावर मुळजी जेठा महाविद्यालय, शासकीय अभियांत्रिकी, खासगी इंजिनिअरिंग काॅलेज अाहे. हजाराे विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षणासाठी येतात. महाविद्यालयीन तरुणांत सतत वाद, हाणामारीच्या घटनाही घडतात. काेल्हे नगरात असलेल्या रामानंदनगर पाेलिस ठाण्यात सतत पाेलिसांची ये-जा असल्याने त्याचा वचक उपद्रवी व टवाळखाेरांवर अापसूक असताे. मात्र, पाेलिस ठाणे हद्दीबाहेर गेले तर हा वचक कमी हाेऊ शकताे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.