आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविशाल श्रीविष्णू महायज्ञाच्या निमित्ताने जमलेल्या शेकडो साधूंच्या सानिध्याने उत्तर महाराष्ट्र विद्यापीठापुढील शिवखोरातील गोर्वधन गोशाळेचा परिसर साधूमय झाला आहे. नागासाधूंची आगळी वेगळी दिनचर्या, विलक्षण आहार, विहार, आराधना यामुळे आठ दिवसांपासून पंचकुडी महायज्ञासह अखंड भंडारा आदी विविध धार्मीक उपक्रमांनी हा परिसर भक्तीमय बनला आहे.
मंगळवारी रामार्चन पुजा उत्सवाने यात रंगत आणली. अखिल भारतीयपंचतेरा भाई त्यागी दिगंबर आखाडा खाकचौक अयोध्या नया घाट यांनी या महायज्ञाचे आयोजन केले आहे. बुधवारी 56 भोग, पूर्णाहुती, बिदाईने या उत्सवाचा समारोप होणार आहे.
गृहस्थ जीवनाचा त्याग करून आजीवन ब्रम्हचर्य पत्करलेल्या साधूंचा सहवास मिळविण्यासह सेवा करण्यासाठीही शहरासह परिसरातील गावांमधूनही शेकडो भाविक शिवखोरा परिसर गाठत आहेत. मंगळवारी 4 जोडप्यांनी रामार्चर पूजन केले.
यावेळी चार क्विंटल फुलांच्या पाकळ्यांची पुष्पवृष्टी करण्यात आली. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना महाप्रसादाचीही व्यवस्था आयोजकांनी केली आहे. यज्ञ आखाड्यासह आठ ते दहा मंडपांमध्ये साधूंचा विश्राम, यासह आपले अन्न स्वत: तयार करून घेण्यातही साधू मग्न असल्याचे दिसून आले.
6 फूट जटांची राखली जाते निगा
दिगंबर आखाड्याचे प्रतापगडाहून आलेले साधू बलराम यांनी आपल्या 6 फूट जटा फैलवून पुन्हा एकसंघ केल्या. त्यांनी सांगितले की, महिलांपेक्षा अधिक नागा साधूंचा श्रृंगार असतो. जटांची नियमित काळजी घेवून त्या सुरक्षित ठेवण्याकडे विशेष लक्ष द्यावे लागते. श्रृंगारानंतर आम्ही सर्व गुरूंना प्रणाम करून आर्शीवाद घेतो. यासह सकाळी ध्यानानंतर शस्त्र आणि शास्त्रा दोघांचा अभ्यास करतो असेही ते म्हणाले.
गुरूंची आज्ञाच अंतिम आदेश
हिमाचल मधून आभात आखाड्यातून आलेले पुरवगिरी जयतिबा महंत यांनी सांगितले की, ब्रह्मचर्य, वैराग, धर्म आणि इतरांची दीक्षा घेवून आम्ही देवतांची आराधना करतो. दिक्षा घेण्याचा कालावधी हा एक वर्ष ते बारा वर्षांपर्यंत असू शकतो. सन्यांसी दिवसातून एक वेळ भोजन करतात. दिवसभर तप, साधनेत तल्लीन होवून भजन कीर्तनातून उपासना करतो, आमच्यासाठी गुरूंची आज्ञा ही अंतिम आहे, एका आदेशावर काही ही करण्यास आम्ही तयार होतो असेही ते म्हणाले.
नागासाधूची उपाधी कशी मिळते?
आखाड्याचे नियम कडक शिस्त बद्द असल्याचे दिसून आले. पहाटे लवकर उठण्यासह स्नान पूजा पाठ करून रात्री पर्यंतची वेळ निश्चत असते. ब्रम्हाचर्यचे पालन करणे ही नागा साधूंची पहिली अट. प्रत्येक नागा साधूस अयोध्येमधील हनुमानाला साक्षी मानून शपथ घ्यावी लागते, यानंतर त्यांना नागासाधूची उपाधी मिळते असेही साधूंनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.