आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बलात्कार प्रकरण:प्रेमाचा बनाव करून विवाहितेवर 23 वर्षांपासून अत्याचार, चार लाख रुपये उकळले, आरोपीवर बलात्काराचा गुन्हा

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रेमाचे नाटक करून विवाहितेसोबत शरीरसंबंध ठेवत तिला चार लाखाचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना जळगाव जिल्ह्यात उघडकीस आली आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निरंजन अशोक लद्दे असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. गेली 23 वर्षे आरोपी हा प्रकार लद्दे करीत होता. अखेर महिलेने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.

नक्की प्रकरण काय?

तु मला आवडते, मला तुझी सवय झाली आहे, तुच माझे प्रेम आहे, असे डायलॉग मारून एकाने विवाहितेसोबत आधी प्रेमाचे नाटक केले. याच प्रेमातून विश्वास संपादन करत वेळोवेळी जबरदस्तीने शरीरसंबंध प्रस्थापित केले. यातून दिवस गेल्यावर विवाहितेचा गर्भपात केला. मला अडचण आहे, असे सांगून पिडीतेकडून चार लाख रुपये तसेच सोन्याची अंगठी देखील उकळली. निरंजन अशोक लद्दे असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

पीडितेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, सन 1998 पासून वेळोवेळी हा प्रकार सुरु होता. मला माझ्या पत्नीपासून सुख मिळत नाही, मला माझी पत्नी आवडत नाही, माझे तुझ्यावरच प्रेम आहे, अशी बतावणी विवाहितेला गेल्या सन 1998 पासून निरंजन करत होता. चाळीसगाव येथील एका ब्युटी पार्लरमध्ये , त्याच्या घरी, शेतात आणि पिडीतेच्या सासरी नाशिक येथे वेळोवेळी तिच्यासोबत शरीर संबंध प्रस्थापीत केले.

खासगी रुग्णालयात गर्भपात

यानंतर पीडिता गर्भवती राहिल्यावर चाळीसगाव येथील एका खासगी दवाखान्यात गर्भपात केला. एवढेच नव्हे तर विवाहीतेला आर्थिक अडचण दाखवून तिच्याकडून निरंजन लद्दे याने वेळोवेळी सोन्याची चैन, अंगठी आणि एकुण चार लाख रुपये देखील घेतले असल्याचे पिडीत महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सचिन कापडणीस करत आहेत. गेल्या 23 वर्षांपासून हा प्रकार लद्दे करीत होता. अखेर महिलेने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.