आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अत्याचाराचा व्हिडीओ केला व्हायरल:मुलाला आणि भावाला जिवे मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार; बदला घेण्यासाठी पोटावर लावला भिलावा

जळगाव21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाचोरा तालुक्यातील मोडाळा येथील 40 वर्षीय महिलेच्या मुलास आणि भावास मारुन टाकण्याची धमकी देत एकाने तिच्यावर अत्याचार केला. तसेच अत्याचाराचा व्हिडीओ तयार करुन गावात व्हायरल केला. तसेच या महिलेच्या भावाने केलेल्या मारहाणीचा बदला म्हणून तीच्या पोटावर भिलावा (बिबा) चोळुन त्वचा जाळली. सायगाव तालुक्यातील घोसला गावात पाच जून रोजी रात्री 9.30 वाजेदरम्यान ही घटना घडली. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अखेर महिलेने पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित महिला मोंडाळा गावातील रहिवासी आहे. तर आबा अंबादास कोळी (रा. घोसला, ता. सोयगाव, जि. औरंगाबाद) याने अत्याचार केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला लग्नसमारंभातून घरी जात असताना कोळी याने दुचाकीने तीचा रस्ता अडवला. बहिणीच्या घरी सोडून देतो असे सांगितले. महिलेने नकार दिल्याानंतर त्याने तीचा मुलगा व भावास जीवेठार मारण्याची धमकी दिली. यानंतर महिलेस दुचाकीवर बसवून 12 किलामीटर अंतर लांब सलेल्या घोसला गावातील त्याच्या शेतात घेऊन गेला. येथे त्याने महिलेवर अत्याचार केला. अत्याचार करतानाचा व्हिडीओ स्वत:च्या मोबाइलमध्ये बनवून ठेवला. यानंतर पुन्हा या महिलेस मोंडाळा गावात आणून सोडले.

व्हिडीओ व्हायरल केला

कोळी याने दिलेल्या धमक्यांना घाबरुन पीडित महिलेने झालेला प्रकार कोणालाही सांगितला नाही. चार दिवसांनी कोळी यानेच गावातील काही लोकांच्या मोबाइलवर अत्याचाराचा व्हिडीओ व्हायरल केला. त्यामुळे घटना उघडकीस आली. महिलेच्या कुटुबिंयानी तीला विश्वासात घेऊन संपुर्ण हकीकत विचारली. यानंतर पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाण्यात कोळीच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक महेंद्र वाघमारे तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...