आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापार्किंसन्स अर्थात कंपवात या आजारावर उपचारासाठी आवश्यक असलेल्या रक्ताच्या दोन वेगवेगळ्या चाचण्या केल्याने कंपवाताच्या प्रमाणाचे निदान होऊन उपचार करणे शक्य होणार आहे. या दोन चाचण्यांचे संशोधन जळगावचे डॉ. केतन शिरीष पाटील यांनी केले आहे. या संशोधनाला युरोपात दाेन व यूएसमध्ये एक असे तीन पेटंट मिळाले आहे.
सध्या न्यूयॉर्क (अमेरिका) येथे स्थायिक असलेले व औषधनिर्माण शास्त्रातील संशोधक डॉ. पाटील यांच्या नावे आतापर्यंत Biomarkers for Parkinson’s disease या आजारावरील उपचार करण्यासाठी आवश्यक चाचणी शोधल्याचे तीन पेटंट मिळाली आहेत. डॉ. पाटील हे शिरीष पाटील यांचे कनिष्ठ चिरंजीव आहे.
रक्ताच्या दोन चाचण्यांची सूचना
ज्या प्रमाणे कोरोना चाचणी करून रुग्ण पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह, प्रमाण किती आहे? हे कळते. त्याचप्रमाणे कंपवाताच्या चाचणी करण्याचे संशोधन डॉ. पाटील यांनी केले आहे. यात दोन प्रकारच्या चाचण्या रक्ताचे नमुने घेऊन केल्या जातात. यात कंपवाताचे प्रमाण ठरवता येते. त्यानुसार, पुढील अचूक औषधोपचार करता येतात. कंपवात हा सहसा वृद्ध व्यक्तींना होतो. त्यामुळे पाश्चिमात्य देशांमध्ये संशोधन होणे गरजेचे होते. डॉ. पाटील यांना दोन देशांनी तीन पेटंट दिले.
अशी आहेत कंपवाताची लक्षणे
कंपवात प्रगतिशील विकार आहे. जो मज्जासंस्थेवर आणि मज्जातंतूंद्वारे नियंत्रित शरीराच्या भागांवर परिणाम करतो. लक्षणे हळूहळू सुरू होतात. हात, पायांना येणारे थरकाप हे लक्षण आहे. कधी कधी शरीराच्या हालचाली मंदावतात. चेहऱ्यावर थोडेसे किंवा कोणतेही भाव दिसू शकतात. चालताना हात फिरू शकत नाहीत. बोलणे अस्पष्ट होऊ शकते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.