आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावकरांसमोर समस्याचा डोंगर:विठ्ठलनगर, कासमवाडी, पांजरपोळ परिसरवासीय संमिश्र समस्यांनी त्रस्त

जळगाव9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विठ्ठलनगरसह कासमवाडी, पांजरपोळ परिसरवासीयांसह प्रभाग 17 मधील अनेक नागरिक हे रस्ते, गटारी, पथदिवे आदी प्राथमिक गरजांसाठी झगड आहेत. येथील अनेक भागातील मुख्य रस्ते हे सुस्थितीत असले तरी या परिसरातील उपरस्त्यावर खड्डे झाले आहेत. अनेक वर्षांपासून येथील रस्ते तयार न झाल्यामुळे या रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. तसेच या परिसरात रस्त्यांप्रमाणेच गटारी व पथदिव्यांच्या तक्रारीही नागरिकांकडून करण्यात आल्या त्यामुळे प्राथमिक गरजांची पूर्तता करावी अशी मागणी नागरिकांतर्फे करण्यात आली आहे.

प्रभाग 17 मधील उपरस्त्यांच्या दयनीय अवस्थेमुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड दयावे लागत आहे. थोडाही पाऊस आल्यास रस्त्यांवरील खड्डे पावसाने भरतात. तसेच रस्त्यांवर मोठ्याप्रमाणात चिखल होतो. पावसाळ्यात डांबरीकरण होऊ शकत नसले तरी या परिसरातील रस्ते वापण्यायोग्य होणे गरजेचे आहे. तसेच अनेक भागातील गटारी करण्याची गरज आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने डासांचे प्रमाण वाल्याने महापालिकेतर्फे फवारणी होण्याची देखील गरज असल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले.

फवारणीची गरज ...

परिसरातील रहिवासी विजय बारी म्हणाले की,​​​​​​​ परिसरात अनेक भागांत खोल खड्ड्यांमध्ये पाणी साचून डासांची उत्पत्ती होत आहे. त्यामुळे साथीचे आजार पसरण्याची भीत व्यक्त करण्यात येत आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने अनेक भागात गवत वाढल्याने या गवतामुळेही डास, चिलटे वाढतात. त्यामुळे खुल्या भूखंडांवरील गवत काढणेही गरजेचे आहे. तरी या परिसरात महापालिकेने फवारणी करण्याची गरज आहे.

कच्चा रस्त्यांवर वाहने अडकतात ...

परिसरातील रहिवासी ओंकार राणे म्हणाले​​​​​​​ की, या परिसरात सर्वच रस्ते हे कच्चे असल्याने पावसाळ्यात येथून जाणारी वाहने अनेकदा खड्ड्यात वा चिखलात अडकतात वा फसत आहेत. तसेच उप रस्त्यावरील अमृत योजनेचे पाइप-लाइनमुळे देखील खड्डे तसेच राहून गेले आहेत. या खड्ड्यांमध्ये देखील पाणी व चिखल साचून वाहने घसरत आहेत. तरी रस्त्यांची पूर्तता करण्याची गरज आहे.

गटारींची नियमित सफाई व्हावी ...

परिसरातील रहिवासी बाळू बारी म्हणाले, या परिसरात रस्ते तर नाहीतच मात्र रस्त्यांबरोबर गटारी करण्याची गरज आहे. तसेच ज्या गटारी आहेत त्या गटारींची नियमित साफ-सफाईची करणे गरजे आहे. येथील अनेक परिसरात गटारी गाळाने भरलेल्या तर काही गटारींचे पाणी रस्त्यांवरून वाहत असल्याने पालिकेने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्यामुळे नवीन गटारी करताना भूमिगत गटारी केल्यास परिसरातील नागरिकांची डासांपासूनही सुटका होऊ शकेल.

बातम्या आणखी आहेत...