आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घसरण:जळगावात पुन्हा गारठा वाढला, तापमान 9.8 अंशांवर; उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा परिणाम

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे तापमानात कमालीची घट हाेत आहे. साेमवारच्या तुलनेत मंगळवारी तापमानात घसरण हाेऊन ९.८ अंश सेल्सिअस नाेंद झाली. गेल्या दाेन ते तीन दिवसांपासून तापमानात घसरण सुरू आहे. साेमवारी १० अंश तापमानाची नाेंद करण्यात आली हाेती. राज्यात जळगावनंतर औरंगाबाद व नाशिक येथे १०.६ अंश सेल्सिअस अशी कमी तापमानाची नाेंद मंगळवारी झाली. दरम्यान, जळगावात जानेवारी महिन्यात यापूर्वी ८ जानेवारी २०१४ राेजी १०.४ अंश सेल्सिअस तर १८ जानेवारी २०२० राेजी ७.० अंश सेल्सिअस तर ३ जानेवारी २०२३ राेजी ९.८ अंश सेल्सिअस तापमानाची नाेंद करण्यात आली.

कारण : उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्याच्या लहरी दाेन ते तीन दिवसांपासून वाढल्या आहेत. अर्थात, साेलर रेडिएशन वेगाने हाेण्यासाठी अडचणी येताहेत.

अंदाज : हवामान विभागाच्या अंदाजानुसार आगामी तीन दिवस गारठ्याचे असतील. गेल्यावर्षीही याच महिन्यामध्ये पहिल्याच आठवड्यात थंडी वाढली हाेती.

बातम्या आणखी आहेत...