आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेनेच्या नगरसेवकांची थेट ठाकरे व शिंदे गटात विभागणी झाली आहे. महापालिकेतील सत्ताधारी ठाकरे गटाकडून केलेल्या ठरावांच्या प्रस्तावाना प्राधान्य न देता ठरावीक प्रभागातील प्रस्तावांना मंजुरी देत निधी वाटप केल्याचा गंभीर आराेप उपमहापाैर कुलभूषण पाटील यांनी केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रातून शिंदे गटाच्या नगरसेवकांना महत्त्व दिल्याची तक्रार त्यांनी केली आहे.
आराेप करणाऱ्या उपमहापाैरांनी राजीनामा द्यावा
उपमहापाैर कुलभूषण पाटील यांनी त्यांच्या प्रभाग क्रमांक १० मध्ये वंचितांच्या वस्तीचा संपूर्ण पाच काेटींचा निधी खर्च केला हाेता. तेव्हा अन्य प्रभागांवर अन्यायच केला हाेता. या विषयाला संपूर्ण सभागृहाचा विराेध हाेता. आणखी निधी मागण्यापेक्षा त्यांनी आराेप करणे ही तर लाजीरवाणी बाब आहे. त्यांनी उपमहापाैरपदाचा राजीनामा द्यायला हवा.
- अॅड. दिलीप पाेकळे, शिवसेना (शिंदे गट )
जिल्हा वार्षिक याेजनेंतर्गत महापालिकेला अण्णा भाऊ साठे दलित वस्ती सुधारणा याेजनेतून १५ काेटी तर सुवर्ण जयंती नगराेत्थान याेजनेतून सन २०२२-२३ अंतर्गत १० काेटींचा निधी महापालिकेला मंजूर हाेता. या निधीतून करण्यात येणाऱ्या कामांचा प्राधान्यक्रम ठरवून मनपात महासभेने प्रस्ताव मंजूर करून महापाैर - आयुक्तांच्या मान्यतेने प्रभागनिहाय विकास कामे हाेण्यासाठी सादर केले हाेते; परंतु या प्रस्तावांना राजकीय द्वेषातून व हेतुपुरस्सरपणे बगल दिल्याचे उपमहापाैरांनी जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
विशेष म्हणजे महापाैर व आयुक्तांनी सादर केलेल्या प्रस्तावांना बाजूला सारत केवळ दाेन ते चार प्रभागांतच पूर्ण निधी वळता करण्यात आला आहे. यामुळे विकास कामांचा असमताेल हाेऊन जनतेचा आक्राेश सुरू आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी मनपाने पाठवलेल्या प्रस्तावानुसार मंजुरी देऊन समताेल राखावा, अशी मागणी केली आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.