आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वातावरणात बदल:जळगाव राज्यात सर्वाधिक‎ कूल, किमान तापमान 7.70

जळगाव‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तब्बल २० दिवसांनंतर जिल्ह्यात पुन्हा‎ एकदा किमान तापमान ७.७ अंश‎ सेल्सिअसच्या नीचांकावर गेले.‎शनिवारी राज्यात सर्वाधिक नीचांकी‎ तापमान जळगावात हाेते. तर राज्यात‎ दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक कमाल‎ तापमान ३२.४ अंश सेल्सिअसही‎ जळगावात नाेंदवले गेले. त्यामुळे‎ जळगावकरांनी शनिवारी रात्र‎ सर्वाधिक कूल-कूल तर दिवस‎ सर्वाधिक हाॅट अशी दुहेरी स्थिती‎ अनुभवली आहे.‎ गेल्या महिन्यात १५ जानेवारी राेजी‎ जळगावात किमान तापमान ७.८‎ अंश सेल्सिअसच्या नीचांकावर गेले‎ हाेते. त्यापूर्वी ९ जानेवारीला ५ अंश‎ सेल्सिअसच्या विक्रमी नीचांकी तापमानाची‎ नाेंद झाली.

मकरसंक्रांतीनंतर २० दिवसांनी‎ शनिवारी किमान तापमान ७.७ अंशांच्या‎ नीचांकावर आले. एकाच दिवसात चार‎ अंशांची घसरण झाली. दुपारी ३२.४ अंश‎ तापमान नाेंदवले गेले. अकाेल्यात ३२.८ तर‎ जळगावात दुसऱ्या क्रमांकाचे कमाल‎ तापमान ३२.४ अंश सेल्सिअस नाेंदवले गेले.‎ पुढील आठवड्यात कमाल तापमान ३२‎ वरून ३८ अंशांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे.‎

महाबळेश्वरपेक्षाही थंड‎
४ फेब्रुवारी राेजी राज्यातील थंड हवेचे‎ ठिकाण असलेल्या महाबळेश्वर येथे रात्रीच्या‎ वेळी किमान तापमान १४.२ अंश सेल्सिअस‎ तर जळगावात त्यापेक्षाही निम्मे म्हणजे ७.७‎ अंश सेल्सिअस तापमान हाेते. अकाेला ११‎ अंश, अमरावती १२.४ अंश, आैरंगाबाद ९.१‎ अंश सेल्सिअस, नाशिक ११.३ अंश,‎ यवतमाळ १०.७ अंश, बुलडाणा १३.४ अंश‎ सेल्सिअस एवढे तापमान नाेंदवले गेले.‎ दरम्यान, रात्रीही गारठा जाणवत हाेता.‎

बातम्या आणखी आहेत...