आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादुय्यम निबंधक कार्यालयात मालमत्तेसंदर्भात खरेदी विक्री झाल्यानंतर तेथून ऑनलाइन प्रक्रियेद्वारे थेट मंडळ अधिकारी व तलाठ्यांकडे जाते. त्या व्यवहाराची तीन महिन्यात नोंद घेणे बंधनकारक आहे. मात्र, जिल्ह्यातील मंडळ अधिकारी व तलाठीस्तरावर तब्बल 1024 फेरफार नोंदी प्रलंबित आहेत. तालुक्यात अशा 104 नोंदी प्रलंबित आहेत. तलाठ्यांनी संबंधितांना नोटीस न दिल्याने जिल्ह्यात 288 फेरफार नोंदी प्रलंबित आहेत.
राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात ऑनलाइन फेरफार प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. त्या अंतर्गत दुय्यम निबंधक कार्यालयात मिकतीच्या नोंदणीसह फेरफार प्रक्रिया एकाच वेळेस करण्यात येत आहे. मिळतीवर फेरफार लावण्यासाठी नागरिकांना तलाठ्यांकडे जावे लागत नाही. दुय्यम निबंधक कार्यालये महसूल कार्यालयांशी जोडण्यात आलेले आहे. जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख यांनी राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र पुणे यांच्या मदतीने विकसित केलेल्या ई-फेरफार आज्ञावलीव्दारे गावपातळीवरील फेरफार प्रकियेचे संगणकीकरण करण्यात आलेले आहे.
आज्ञावलीव्दारे फेरफार नोटीस
तहसीलदार कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय, उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय व नगर भूमापन अधिकारी कार्यालय हे स्टेटा डेटा सेंटरशी संगणकीय कनेक्टीव्हीटीव्दारे जोडण्यात आलेली आहेत. तसेच या प्रकल्पांतर्गत तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालये देखील जोडण्यात आलेली आहेत. आज्ञावलीव्दारे दुय्यम निबंधक कार्यालयात मिळकतीची दस्त नोंदणी झाल्यानंतर त्या दस्तानुसार तत्काळ फेरफार नोंद घेण्याची कार्यवाही जिल्ह्यात सुरू करण्यात आलेली आहे. नाेंदणी झालेल्या दस्ताची माहिती आज्ञावलीव्दारे तहसील कार्यालयात प्राप्त होते. तेथे आज्ञावलीव्दारे फेरफार नोटीस तयार होत आहे.
फेरफार नोंदीचा एसएमएस
ही नोटीस स्वाक्षरीत झाल्यानंतर दुय्यम निबंधक कार्यालयास माहिती मिळेल दुय्यम निबंधक कार्यालयात ती नोटीस डाऊनलोड करण्यात येते. तिची प्रिंट घेवून दस्त नोंदणीकरीता हजर असलेल्या व्यक्तींना देण्यात येते. संबंधीत तलाठी व दस्तातील पक्षकारांना फेरफार नोंदीचा एसएमएस पाठविल्या जातो. अशा पद्धतीने दस्त नोंदणी व फेरफार नोंद घेण्याची कार्यवाही एकत्रित होत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.