आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • Jalgaon Taluka, The Voting Percentage Increased To 91.26 Percent; Counting Of Votes Tomorrow, 85.64 Percent Voting For Secondary Teachers Credit Fund

माध्यमिक शिक्षक पतपेढीसाठी 85.64 टक्के मतदान:जळगाव तालुक्यात मतदानाचा टक्का वाढला 91.26 टक्के मतदान

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर पतपेढीच्या 16 संचालक पदासाठी रविवारी मतदान झाले. यापूर्वीच 5 संचालक बिनविराेध निवडणून आलेले आहेत. रविवारी पतपेढीच्या 10 180 पैकी 8718 मतदारांनी (85.64 टक्के) जिल्हाभरात मतदानाचा हक्क बजावला. जळगाव तालुक्यातील 389 मतदारांपैकी 355 जणांनी (91.26 टक्के) मतदान केले.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विजयसिंह गवळी हे काम पाहत आहे. जळगाव शहरात लेवा भवन येथे सकाळी आठ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली, संध्याकाळी चार वाजता मतदानाची प्रक्रिया पार पडली. निवडणूक प्रक्रियेसाठी जळगाव शहरासह जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील मिळून दीडशे कर्मचारी निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आले आहेत. सोमवारी सकाळी आठ वाजता मतमोजणी ला सुरुवात होणार आहे.

पतपेढीच्या 21 संचालक निवडणुकीसाठी ही निवडणूक हाेत आहे. त्यापैकी महिला राखीव गटातील दाेन उमेदवारांसह एकूण 5 संचालक बिनविराेध निवडणून आलेले आहेत. त्यात विद्यमान अध्यक्ष शालिग्राम ज्ञानदेव भिरुड, सिध्देश्वर वाघुळदे (यावल), जगदीश अशाेक पाटील (भडगाव) साेनम महेश पाटील, वैशाली मुरलीधर महाजन(झाेपे) यांचा समावेश आहे.

उर्वरित सर्वसाधारण, एससीएसटी, व्हीजेएनटी व आेबीसी या गटातील संचालक निवडीसाठी ही निवडणूक झाली. यात आरक्षित गटाव्यतिरिक्त सर्वसाधारण गटासाठी प्रत्येक तालुक्यात मतदान झाले. त्यासाेबत राखीव गटासाठीही तालुक्यातून मतदान झाले. निवडणुकीत सहकार पॅनलने पूर्ण पॅनल उभे केले हाेते. तर परिवर्तन पॅनलतर्फे एससीएसटी, व्हीजेएनटी व आेबीसी या राखीव गटासाठी उमेदवार दिले हाेते. तर व्हीजेएनटी साठी 2 आेबीसीसाठी एक असे अपक्ष उमेदवार रिंगणात उतरलेले आहेत.

अपक्षाचा बाेलबाला..

पॅनलमध्ये राखीव जागांसाठी सरळ लढत असली अपक्षांचाही बाेलबाला अधिक हाेता. यात प्रशांत काेल्हे (जळगाव), शैलेश राणे (रावेर),विकास तळेले (भुसावळ) गजानन निळे (व्हीजेएनटी) यांची चर्चा हाेती

बातम्या आणखी आहेत...