आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॅडमिंटन:राज्य वरिष्ठ आंतरजिल्हा बॅडमिंटन स्पर्धेसाठी जळगावचा संघ रवाना

जळगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ठाणे येथे ३ ते ५ एप्रिलदरम्यान महाराष्ट्र राज्य वरिष्ठ आंतरजिल्हा बॅडमिंटन स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचा पुरुष व महिला संघ रवाना झाला आहे.

स्पर्धेत पुरुष संघाचा कर्णधार शुभम पाटील तर महिला संघाची कर्णधार साची गांधी असणार आहेत. निवड झालेल्या पुरुष संघात शुभम पाटील, प्रणव पाटील, गोपाल पाटील, दीपेश पाटील, कृष्णा अग्रवाल, उमेर देशपांडे, अथर्व शिंदे, ओजस सोनवणे, देवेश पाटील यांची तर महिला संघात साची गांधी, राजश्री पाटील, सुगीता चौधरी, इशिका शर्मा, सौम्या लोखंडे यांची निवड करण्यात आली आहे.

तसेच संघासोबत प्रशिक्षक म्हणून किशोर सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघाला निरोप देण्यासाठी जिल्हा बॅडमिंटन संघटनेचे सचिव विनीत जोशी, सभासद चंद्रशेखर जाखेटे, खजिनदार, अरविंद देशपांडे, जैन इरिगेशनचे अनिल जोशी आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...