आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव विद्यापीठ सिनेट निवडणूक:उपकुलसचिवांना निवडणुकीचे काम जमणार नाही म्हणत मविआ आक्रमक

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सिनेट निवडणूकीच्या संदर्भात काम करणाऱ्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या दोन अधिकाऱ्यांनी कुलगुरू प्रा. डाॅ. व्ही. एल. माहेश्वरी यांच्याकडे राजीनामा दिल्यानंतर गेल्या आठवड्यात उपकुलसचिव तथा बांधकाम विभागचे प्रमुख राजेश पाटील यांना निवडणूकीचे काम पाहण्यासाठी नेमले आहे. दरम्यान, पाटील हे एका तांत्रिक विषयाचे प्रमुख असून त्यांना अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह काम कसे जमेल? असा प्रश्न उपस्थित करीत निवडणूक प्रक्रियत पारदर्शकता राहणार नाही. असे आरोप युवक काँग्रेस, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस व शिवसेना अशा तीनही पक्षांनी केला आहे.

सिनेट निवडणूकीच्या पदवीधर गटातील मतदार नोंदणीसाठी विद्यापीठाने दोन वेळा मुदतवाढ दिली आहे. 16 हजार मतदारांची बोगस नोंदणी झाल्याचा आरोप सुरूवातीला करण्यात आला होता. यापूर्वी नेमलेल्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकला जातो आहे, मतदार यादीत समाविष्ठ केलेल्या सर्व पदवीधरांच्या सादर केलेली कागदपत्रे पाहण्यासाठी मिळावी अशी मागणी संघटनांनी केली आहे.

या बाबत वारंवार निवेदन देऊन देखील त्याचे निराकरण विद्यापीठाने केलेले नाही. निवडणूकीपूर्वीच संघटना आक्रमक झाल्यामुळे विद्यापीठातील वातावरण तापले आहे. दरम्यान, मतदार यादीत कोणत्याही प्रकारच्या त्रुटी आढळुन येऊ नये म्हणून राज्यस्तरावर तक्रार करण्याची तयारी तीन्ही संघटनांनी केली आहे. एका विशिष्ट संघटनेकडून विद्यापीठ प्रशासनावर दबाव टाकला जातो आहे. प्रशासनाने दबावास बळी न पडता पादर्शकपणे प्रक्रिया पुर्ण पाडावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल. अशी भुमिका शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णु भंगाळे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अ‍ॅड. कुणाल पवार, एनएसयुआयचे देवेंद्र मराठे यांनी घेतली आहे.

बोगस मतदार नोंदणीवर नजर

सिनेट निवडणूकीच्या पदवीधर गटात 16 हजार मतदारांची बोगस नोंदणी झाली आहे, ती दुरूस्त करा असे निवेदन विद्यापीठाला देण्यात आले आहे. असा आरोप अनेक वेळा करण्यात आला आहे. त्याचे निराकरण अद्याप झाले नाही. मागच्या टर्ममध्ये देखील ही अडचण होती. तेंव्हाचे आकडे देखील स्पष्ट झालेले नाही. गेल्या निवडणूकीत काही मतदार पुणे विद्यापीठाशी संलग्न होते, त्यांची छाणनी करणे अपेक्षीत आहे. त्यामुळे यंदा अडचणी निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. असा आरोप करण्यात आला आहे.

कुलसचिवांच्या देखरेखीतच होतेय प्रक्रिया

कुलगुरू​​​​​​​ प्रा. डॉ. व्ही. एल. माहेश्वरी म्हणाले की, विद्यापीठाचे कुलसचिव हेच निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. त्यांच्या देखरेखीतच एक उपकुलसचिव व समिती काम करीत आहे. मतदार यादी तयार झाल्यानंतर त्यात कोणाला आक्षेप असल्यास ती अडचण दुर केली जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...