आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठाची सिनेट निवडणूक:मतदानाच्या तोंडावर अफवांचा पाऊस; विद्यापीठाने मार्गदर्शक सूचना केल्या जाहीर

जळगाव23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिनेट निवडणुकीचा रविवारी पहिला टप्पा आहे. या निवडणुकीचा प्रचार ऐन रंगात आला असताना शुक्रवारी विद्यापीठासंबंधीची चुकीची माहिती देणारे व्हिडिओ व्हायरल झाले. परिणामी, या प्रकरणी अनेक प्राध्यापकांनी थेट विद्यापीठात फोनवरुन तक्रारी दाखल केल्या आहेत.

सिनेट निवडणूकीत प्राधान्य क्रमानुसार मतदान केले जाते. परंतु, एका चुकीच्या व्हिडीओनुसार पाच उमेदवारांना मत दिले तरच मत ग्राह्य धरले जाणार आहे. त्या पेक्षा अधिक जणांना पसंतीक्रम दिला तर मत अवैध ठरेल. अशी अफवा पसरवली गेली. काही गटात पाचपेक्षा अधिक उमेदवार निवडणूक लढवत असल्यामुळे त्यांना ही अडचण निर्माण होणार होती. या संदर्भात तक्रारी आल्यानंतर विद्यापीठाने संकेतस्थळावर मार्गदर्शक सूचना प्रसारीत केल्या आहेत.

विद्यापीठाने निवेदन प्रसिध्दीला दिले असून यामध्ये म्हटले आहे की, मतदान प्रक्रिये संदर्भात सर्व सुचना विद्यापीठाने www.nmu.ac.in या संकेतस्थळावर प्रसिध्द केल्या आहेत. मतदान प्रक्रियेबाबत महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलेले एकरूप परिनियम क्र.1/2017 दि. 17 मे 2017 मधील तरतुदींनुसार व त्या अनुषंगाने विद्यापीठाने वेळोवेळी 2022 मधील विद्यापीठ प्राधिकरण निवडणुकांसाठी जाहीर केलेल्या सुचना, निदेशाप्रमाणे मतदान करावयाचे आहे. याव्यतिरिक्त मतदान कसे करावे याबाबत विद्यापीठाने कोणत्याही प्रसार, समाज माध्यमाव्दारे चित्रफित निर्गमित केलेली नाही. याची सर्व संबंधित मतदार व उमेदवारांनी नोंद घ्यावी असे या निवेदनात म्हटले आहे.

सर्व सूचना संकेतस्थळावर

निवडणूक, मतदानाची प्रक्रिया वेळोवेळी संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. या शिवाय समाजमाध्यमातील चित्रफीतींवर मतदारांनी विश्वास ठेऊ नये. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर सर्व माहिती दिली आहे.

- प्रा. डॉ. व्ही. एल. माहेश्वरी, कुलगुरू

बातम्या आणखी आहेत...