आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआठ दिवसांपूर्वीच चारीत्र्याच्या संशयावरुन रामेश्वर कॉलनी येथील तरुणाचा खुन झाला होता. ही घटना ताजी असतानाच मंगळवारी सायंकाळी सात वाजता जुने बसस्थानक परिसरात पुर्ववैमनस्यातून तीन तरुणांवर दोघांनी चाकुने हल्ला चढवला. यात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी आहेत. या घटनेनंतर मारेकरी शहर पोलिसांना शरण आला.
आकाश सुरेश सपकाळे (वय 24, रा. कोळीपेठ) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर सागर सुरेश सपकाळे व सागर आनंदा सपकाळे हे दोघे गंभीर जखमी आहेत. मारेकरी अण्णा सैंदाणे (पुर्ण नाव माहित नाही) हा पोलिसांना शरण आला आहे. तर राजु सपकाळे (पुर्ण नाव माहित नाही) हा दुसरा मारेकरी बेपत्ता आहे.
घटना अशी की, मृत आकाशसह जखमी व मारेकरी असे सर्वजण जुने बसस्थानक परिसरातील एका पत्त्यांच्या क्लबवर एकत्र आले. या दोन्ही गटांमध्ये पुर्वीपासून वैमनस्य आहे. यातच ते समोरासमोर आल्यामुळे आपसात बाचाबाची सुरू झाली. क्षणार्धात त्याचे हाणामारीत रुपांतर झाले. वाद वाढत असल्यामुळे आकाश सपकाळे, सागर सपकाळे व सागर आनंदा सपकाळे हे क्लबवरुन खाली उतरुन रस्त्यावर धावत होते. अण्णा व राजु हे त्यांच्या मागुन धावत येऊन मारहाण करण्याचा प्रयत्न करीत होते.
मुख्य रस्त्यावर पोहोचताच अण्णा याने एका भेळच्या गाडीवरुन चाकु हातात घेऊन तीघांवर सपासप वार केले. यात आकाशचा जागेवरच मृत्यू झाला तर सागर सपकाळे व सागर आनंदा सपकाळे हे दोघे गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर अण्णा हा स्वत:हुन शहर पोलिस ठाण्यात दाखल झाला. तर नागरीकांनी मृत आकाश व दोघी जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड यांच्यासह पथक रुग्णालयात दाखल झाले. पोलिसांनी जमाव पांगवुन नियंत्रण केले.
अण्णाचा मारहाण केल्याचा दावा
पोलिस ठाण्यात हजर झालेला अण्णा देखील जखमी होता. आकाश व सागर हे मला मारहाण केली असल्याने तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात आल्याचे त्याने सुरूवातीला पोलिसांना सांगीतले. दरम्यान, या हल्ल्यात आकाशचा मृत्यू झाल्याचे कळाल्यानंतर पोलिसांनी अण्णाला ताब्यात घेतले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.