आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समस्या:शहरातील प्रमुख समस्या व मुद्द्यांबाबत जळगावकरांचा आवाज; रस्ते, पार्किंग, ड्रेनेजची समस्या कायमस्वरूपी सोडवा

जळगाव11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव शहरातील प्रमुख समस्या व मुद्द्यांबाबत जळगावकरांचा आवाज म्हणून ‘दिव्य मराठी’च्या वतीने ‘रुबरू : गोष्ट तुमची अन‌् तुमच्या वॉर्डाची’ हा विशेष उपक्रम राबवला जाताे आहे. पहिला ‘रुबरू’ रविवारी प्रभाग क्रमांक १२मधील मायादेवी नगरातील रोटरी भवनात घेण्यात आला. प्रभागात येणाऱ्या कॉलन्यांतील रस्ते, पार्किंग, ड्रेनेजची समस्या कायमस्वरूपी सोडवावी आदी मागण्या रहिवाशांनी केल्या. त्या सोडवण्याचे आश्वासन महापौर व विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले.

खुल्या मैदानात दारूच्या पार्ट्या
संभाजीराजे नाट्यगृहाशेजारी असलेल्या मोकळ्या मैदानात मोठ्या प्रमाणावर दारूच्या बाटल्या पडलेल्या असतात. रात्री याठिकाणी लोक दारू पीत बसत असल्याने नागरिकांना याचा त्रास होतो. सामाजिक स्वास्थ्य धोक्यात आले आहे. यंत्रणेनेने वेळीच लक्ष पुरवावे. गोपाळ महाजन, नागरिक

खराब रस्त्याने वाहने घसरतात पी. ई. तात्या कॉलेजच्या वसतिगृहाजवळील रस्त्यावर वाळू पडलेली आहे. रस्तादेखील खराब झाला आहे. यामुळे याठिकाणी दररोज वाहने घसरून जायबंदी हाेण्याची वेळ वाहनचालकांवर आली आहे. जीवितहानी होण्यापूर्वी उपाययोजना करणे केशवराव पाटील, नागरिक

बांधकामाच्या ठिकाणी असलेली वाळू रस्त्यावर येते, त्यामुळे वाहने स्लिप होतात तर दुसरीकडे रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून, पावसाच्या पाण्यामुळे ते दिसून न आल्याने वाहने घसरण्याची भीती वाढली आहे. महापालिकेने हा प्रश्न गांभिर्याने घेतला पाहिजे.विश्वजित चौधरी, नागरिक

मायादेवीनगराच्या मंदिराजवळ असलेल्या सभागृहामध्ये होणाऱ्या कार्यक्रमांसाठी डीजे लावला जातो. यामुळे नागरिकांना त्रास होतो. तसेच गाड्यांमुळे वाहन जाण्यासही जागा नसते. तक्रारी देऊनही त्यांच्यावर कारवाई होत नाही. नागरीक गोगाटाने हैराण झालेले आहेत. रत्नाकर वाणी, नागरिक

आम्ही विद्यानगरात राहत असून, आमच्याकडे गटारीची समस्या आहे. जवळच असलेल्या हॉटेलमधील पदार्थ गटारीत टाकलेले असल्याने याठिकाणी गटारी तुंबतात परिणामी ते पाणी रस्त्यावर येते. पावसाळ्याच्या दिवसात साथरोगांचा फैलाव होण्याचा धोका आहे. निरंजन जोशी, नागरिक

समतानगरातील वीज चोरीच्या समस्येचा नागरिकांना त्रास आहे. येथे कनेक्शन देण्यास तांत्रिक अडचणी आहेत. नगरसेवकांना सोबत घेऊन त्यांना कनेक्शन देणे, अंडरग्राऊंड केबल टाकण्याच्या प्रस्तावाचा वरिष्ठ कार्यालयाकडे यशस्वीपणे पाठपुरावा केला जाईल. हेमंत खांडेकर, सहायक अभियंता, महावितरण

हाती घेतलेली अपूर्ण कामे पूर्ण करण्यास प्राधान्य देऊ. प्रत्येक वेळी राज्य शासनाकडून पैसे आणणे, समान वाटप करण्याचे आव्हान असते. मेहरूण तलावासाठी आताच १० कोटी रुपये मिळाले आहेत. या प्रभागातील कामे पावसाळ्यानंतर मार्गी लागतील, याची खात्री देते.जयश्री महाजन, महापौर

नागरिकांना ओपन स्पेस, बगिचे यांची कामे आता करता येणार नाहीत. संपूर्ण १२ कोटींचा निधी रस्ते आणि गटारीवर खर्च करणार आहोत. अपूर्ण नळ कनेक्शन घेऊन त्यानंतर रस्त्यांची कामे सुरू हाेतील. या समस्या सोडवल्यानंतर पुढील वेळी अन्य कामे घेता येतील.नितीन बरडे, नगरसेवक

बातम्या आणखी आहेत...