आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासुदृढ आणि निरोगी आरोग्याचा कानमंत्र देत सलग तिसऱ्या वर्षी जळगाव रनर्स ग्रुपने आयोजित केलेल्या मॅरेथॉनमध्ये जळगावकरांनी रविवारची पहाट गाजवली.
यात जळगावसह राज्यभरातून रनर्स सहभागी झाले होते. पहाटेच्या थंडीत विविध गटांतील तब्बल 2 हजार 900 नागरिकांनी धावण्याचा आनंद लुटला. 21 किलोमीटरच्या हाफ मॅरेथॉनमध्ये 150 नागरिकांनी सहभाग नोंदवला. तर सर्वाधिक 1750 नागरिक 3 किलोमीटरच्या रनमध्ये धावले. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पहाटेच रस्त्यावर जळगावकरांची मोठी उपस्थिती होती. तसेच त्यांनी पुष्पवर्षाव करून धावपटूंचे जल्लोषात स्वागत करून लक्ष वेधून घेतले.
संगीताच्या तालावर रनच्या सुरुवातील व्यायाम, डान्स करण्यात आला. चार विविध गटात ही मॅरेथॉन झाली. पहाटे 5.30 वाजता थंडीत 21 किलोमीटर अंतराच्या या रनला सागर पार्क येथून अशोक जैन यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून सुरुवात झाली.
21 किलोमीटर, 10 किलोमीटर, 5 किलोमीटर आणि 3 किलोमीटर या गटांमध्ये स्पर्धा झाली. सागर पार्क येथून रनला सुरुवात झाल्यानंतर काव्यरत्नावली चौक, डी-मार्ट, लांडोरखोरी व यू-टन घेऊन पुन्हा सागर पार्कवर येऊन रनची सांगता करण्यात आली. खान्देश रनमध्ये उत्कर्ष मतिमंद विद्यालय व पौढ मितमंद मुलांची संरक्षित कार्यशाळे दिव्यांगही सहभागी झाले होते.
खासदार उन्मेष पाटील, महापौर जयश्री महाजन, जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, जैन इररिगेशनचे अशोक जैन, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित, पोलिस सहअधीक्षक संदीप गावित टाटा एआयजीचे मयूर शिंदे, गोदावरी फाउंडेशनचे डॉ. उल्हास पाटील, डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील, राजेश चोरडिया, मनोज आडवाणी, प्रा. डी. डी. बच्छाव, माजी महापौर रमेश जैन, रायसोनी कॉलेजचे प्रीतम रायसोनी, सम्राट शर्मा, तुषार भामरे, लोकेश साळुंखे आदीसह लोकप्रतिनिधी, सामाजिक, वैद्यकीय, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर धावले.
पहाटे 5.30 वाजता पहिली 21 किलोमीटर अंतराची रनला सुरुवात झाली. हिवाळा असल्याने सर्वत्र अंधार होता. दरम्यान, रस्त्यांच्या वेध घेऊन रनर्स धावताना दिसत होते. दुसऱ्या गटाची फेरी सुरू होण्यापूर्वी उजेड पडल्याने इतर गटांची स्पर्धा व्यवस्थितरीत्या पार पडली.
'खान्देश रन' स्पर्धेत धावणाऱ्या खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती. या मॅरेथॉनमध्ये 5 वर्षांच्या मुलापासून ते 85 वर्षांच्या ज्येष्ठांपर्यंत जिल्ह्यासह राज्यातील नागरिक सहभागी झाले होते. त्यामुळे सागरपार्कसह मॅरेथॉन मार्गावर शहरातील काही डॉक्टर्सची टीम व रुग्णवाहिकाही उपलब्ध होत्या. ठिकठिकाणी उपचाराच्या सुविधाही या धावपटूंसाठी करण्यात आली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.